संगमेश्वर तालुक्यातील विकसित भारत संकल्प रथयात्रेची सांगता…

पिरंदवणे | जानेवारी २४, २०२३.
विकसित भारताचे स्वप्न घेऊन देशातील खेडोपाडी, कानाकोपऱ्यापर्यंत प्रवास करणाऱ्या विकसित भारत रथयात्रेचे आगमन काल मंगळवार दि. २३ जानेवारी रोजी दु. ०३:०० वा. ग्रा.पं. पिरंदवणेच्या कार्यक्षेत्रात झाले. सर्वपक्षीय पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व प्रतिष्ठित नागरिक यावेळी स्वागतासाठी उपस्थित होते.
‘सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण’ या त्रिसूत्रीवर आधारित अंत्योदयाचे लक्ष्य घेऊन केंद्र सरकार पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्त्वाखाली धिरोदात्तपणे कार्य करत आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ हा नारा देत ‘यही समय हैं, सही समय हैं’ हा घोष गावागावात घुमला. कल्याणकारी योजनांची झालेली पूर्तता आणि अद्याप शिल्लक राहिलेल्या कामांच्या माहितीची देवाणघेवाण यानिमित्ताने झाली.

मोदी सरकार राष्ट्राचे कल्याण साधताना शेवटच्या घटकाच्या उत्थानासाठी प्रयत्नरत आहे. २०४७ साली भारताला विकसित राष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी विकासाच्या गतीमध्ये आमुलाग्र वाढ होण्याची अपेक्षा या रथयात्रेच्या निमित्ताने व्यक्त केली. पायाभूत सुविधा, स्थानिक पातळीवर रोजगार-व्यवसायांची निर्मिती, महिला सशक्तीकरण, बालविकास अशा एक ना अनेक पातळ्यांवर सुधारणेला अजूनही वाव आहे. आर्थिक दरी दूर करण्यासाठी आणि भारताला समृद्ध बनवण्यासाठी मोदी सरकार कल्पक योजना कार्यान्वित करत आहे. याचा लाभ प्रत्येकाने घ्यावा याबाबत आवाहनही यावेळी करण्यात आले.
भाजपा नेते, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा सह-प्रभारी, रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख, मा. आमदार श्री. बाळासाहेब माने यांनी दूरध्वनीद्वारे कार्यक्रमासाठी शुभेच्छा व्यक्त करत “विकासाच्या प्रवाहात समस्त पिरंदवणेकरांचे स्वागत आहे. यापुढील काळात पिरंदवण्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मी प्रयत्नशील आहे” असे ते म्हणाले.
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी (द.) जिल्हा सरचिटणीस सौ. नुपूरा मुळ्ये, महिला मोर्चा संगमेश्वर (उ.) तालुकाध्यक्षा सौ. शीतल दिंडे, उपाध्यक्ष श्री. प्रशांत रानडे, श्री. राजेश आंबेकर, महिला मोर्चा तालुका सरचिटणीस सौ. वैदेही गुरव, बूथ प्रमुख व गावचे मानकरी श्री. अरविंद मुळे, शाखा प्रमुख श्री. दत्ताराम मेस्त्री, सरपंच श्री. विश्वास घेवडे, उपसरपंच सौ. अंजली मेस्त्री, मा. सरपंच सौ. माधवी गुरव, ग्रा.पं. सदस्या सौ. अंजली झगडे, कु. पल्लवी घेवडे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री. गणेश आंग्रे, जि.प. शाळा पिरंदवणेचे मुख्याध्यापक श्री. संदेश सावंत सर, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी श्री. गिरी साहेब, मंडल अधिकारी श्री. देसाई साहेब, ग्रा.पं. मांजरेचे ग्रामसेवक श्री. रोशन जाधव, पिरंदवणे ग्रामसेवक सौ. माया गुरखे, आरोग्य सेविका सौ. सुलभा भोजे, तलाठी कार्यालय डिंगणीचे कोतवाल श्री. मिलिंद राऊत, पोलीस प्रतिनिधी श्री. रसाळ, अंगणवाडी शिक्षिका नम्रता शिंदे बाई, सेविका विद्या धोपट, आशा सेविका सुप्रिया मेस्त्री, ज्येष्ठ नागरिक प्रभाकर घेवडे, श्री. दत्ताराम धोपट, श्री. विष्णू तळेकर, ग्रामपंचायत कर्मचारी संतोष माने, महिला बचत गट सदस्या, युवावर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.
