ठाणे : राज्य सरकारने गावच्या विकासासाठी राखीव ठवेलेल्या गायरान जमिनीवर म्हाडाने इमारती उभारल्या असून गावच्या आरक्षित जागेवर बांधलेल्या इमारतींचा ताबा ७ नोव्हेंबर रोजी भंडार्ली उत्तरशिव गोठेघर ग्रामस्थ घेणार असल्याचा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंग गायसमुद्रे यांनी दिला आहे.
भंडार्ली गोठेघर गाव आणि रजिया मार्केट या आरक्षित जागेवर म्हाडा तर्फे खाजगी विकासकाने ग्रामपंचायत आणि इतर कोणतीही परवानगी न घेता इमारतीचा बांधल्याचा ग्रामस्थांचा आरोप असून ही जागा गावच्या विकासासाठी, शाळा बांधण्यासाठी तसेच इतर सामाजिक कार्यासाठी वापरण्याची ग्रामस्थांची मागणी होती. अनेक मोर्चे आंदोलने करून सुद्धा ही जागा मिळत नसल्याने या ग्रामस्थांनी प्रांत, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
प्रांत अधिकाऱ्यांनी ६ सप्टेंबर रोजी नागरिकांना न्याय देण्याचे तोंडी आश्वासन दिले असताना, आजपर्यंत ग्रामस्थांना अद्याप न्याय मिळाला नाही.
या प्रकरणी प्रांत अधिकाऱ्यांनी ६ सप्टेंबर रोजी नागरिकांना न्याय देण्याचे तोंडी आश्वासन दिले असताना आजपर्यंत नागरिकांना न्याय मिळाला नसल्यामुळे ग्रामस्थानी आक्रमक पवित्रा घेत. येत्या मंगळवारी ७ नोव्हेंबर रोजी हे ग्रामस्थ म्हाडाच्या इमारतींचा ताबा घेणार असा इशारा ग्रामस्थानी प्रशासनाला दिला आहे
जाहिरात
जाहिरात