मनोज जरांगे पाटील यांच्या मागे अदृश्य शक्ती ; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ !

Spread the love

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली 40 दिवसांची डेडलाईन कालच संपली आहे. काल दिवसभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाची कोणतीही घोषणा केली नाही.. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न अंधांतरीच लटकण्याची चिन्हे आहेत. असं असलं तरी मनोज जरांगे पाटील मात्र आमरण उपोषणावर ठाम आहेत. आजपासून ते अंतरवली सराटीत पुन्हा आमरण उपोषण करणार आहेत.

त्यावर आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावरून आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी जरांगे पाटील हे प्रामाणिक आहेत . पण त्यांच्या मागे अदृश्य शक्ती आहे, असा दावा त्यांनी केला आहे. शिरसाट यांच्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले , आरक्षणाचा मुद्दा 40 वर्षांपासूनचा आहे. आरक्षणावर बोलणाऱ्या विरोधकांनी काय केलं? रस्त्यावर का आला हा समाज? यांनीच त्रास दिला. वंचित ठेवलं. आरक्षणावर ओरडणाऱ्यांनी प्रत्यक्षात काय केलं? या आरक्षणाचं फायनल काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच करतील, असं सांगतानाच जरांगे पाटील यांच्यामागे अदृश्य शक्ती आहे. ते प्रामाणिक आहेत. पण आजूबाजूचे लोक फायदा घेऊ इच्छितात. फायदा घेणारे हे सगळे भोंगे आहेत, असं संजय शिरसाट म्हणाले. दरम्यान मनोज जरांगे पाटलांनी त्यांची भूमिका ठरवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपली भूमिका मांडली आहे. जाहीर सभेत त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्याला सगळ्यात चांगलं उत्तर दिलं आहे. यात काही कायदेशीर बाबी तपासल्या गेल्या आहेत. मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजाला आरक्षण देणं ही गरज आहे. 50 टक्केची लिमिट वाढेल की आणखी काय करता येईल हे पाहावं लागणार आहे. टिकणारं आरक्षण देणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणत आहेत. त्यामुळे इतरांनी ते समजून घेतलं पाहिजे, असं शिरसाट म्हणाले.

दरम्यान कालच्या दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका केली होती. त्यावरही त्यांनी भाष्य केलं आहे . ते म्हणाले , उद्धव ठाकरे हे घोटाळा नाही तर कलाकार आहेत. जे तुम्हाला जमलं नाही ते एका सर्वसाधारण शिवसैनिकांने करून दाखवलं. त्यामुळे तुमच्या पोटात दुखू लागलं आहे. घोटाळेबाज कोण हे कळेल. संजय राऊत बेलवर आलेत. वायकर यांना नोटीस आली आहे. घोटाळे पुढे येतील. चेहरे उघड पडतील, असा दावाही त्यांनी केला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page