वर्ल्ड कप सुरु असतानाच BCCI ने घातली भारतीय खेळाडूवर दोन वर्षांची बंदी, पाहा नेमकं काय घडलं…

Spread the love

BCCI : वर्ल्ड कपचा रंग चांगलाच चढलेला आहे. पण बीसीसीआयने वर्ल्ड कप सुरु असतानाच भारताच्या एका खेळाडूवर दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने हा निर्णय का घेतला आहे जाणून घ्या…

नवी दिल्ली : भारतामधील वर्ल्ड कप ऐन रंगात आला आहे. त्याचबरोबर भारतीय संघही दमदार कामगिरी करतो आहे. भारतीय संघाने सलग सहा विजय मिळवले असून ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहेत. हे सारं काही सुरळीत सुरु असताना मात्र बीसीसीआयने भारतीय खेळाडूवर दोन वर्षांची बंदी घातली आहे.

नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या…

बीसीसीआय हे आपल्या नियमांशी कधीही तडजोड करत नाही. त्यामुळे खेळाडू कितीही मोठा असला तरी त्याला सारखेच नियम दाखवले जातात. बीसीसीआयने ही गोष्ट पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. बीसीसीआयने क्रिकेटच्या हितासाठी काही नियम बनवले आहेत आणि त्यामध्ये आता भारताचा युवा क्रिकेटपटू दोषी ठरला आहे.

जम्मू-काश्मीरचा क्रिकेटपटू वंशज शर्मा आता अडचणीत सापडला आहे. वेगवेगळ्या जन्मतारीखांसह दोन वेगवेगळी जन्म प्रमाणपत्र दिल्याबद्दल त्याला दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. वंशज हा मूळचा जम्मूमधील बिश्नाह येथील राहणारा आहे, पण तो खेळण्यासाठी बिहारमध्ये गेला होता. बिहारच्या संघाकडून खेळत असताना त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

“वंशज शर्मा हा सध्या बिहार क्रिकेट असोसिएशनसाठी खेळत आहे आणि जम्मूच्या संघासाठी नाही, हे मी प्रथम तुम्हाला सांगू इच्छितो. आम्ही त्याला २०२०-२१ च्या हंगामात प्रथम १९ वर्षांखालील खेळाडू म्हणून नोंदणीकृत केले होते, परंतु तो कधीही जम्मू-काश्मीरच्या संघाकडून खेळला नाही. नंतर तो बिहार क्रिकेट असोसिएशनमध्ये सामील झाला. त्यांनी त्याची वेगळ्या जन्मतारीखसह २३ वर्षांखालील खेळाडू म्हणून नोंदणी केली. बीसीसीआयला ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी त्याच्यावर कारवाई केली आहे. एकापेक्षा जास्त जन्म प्रमाणपत्रे सादर केल्याबद्दल त्याच्यावर बीसीसीआयने बंदी घातली आहे,” असे ब्रिगेडियर अनिल गुप्ता यांनी सांगितले. अनिल गुप्ता हे जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशन (JKCA) चे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

जम्मू-काश्मीरच्या संघटनेने अधिकृतपणे सांगितले की, वंशज शर्मावर २७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सर्व BCCI टूर्नामेंटमधून दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. बंदीनंतर तो कोणत्याही वयोगटातील स्पर्धांमध्ये नाही.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page