
भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार? बावनकुळे, शेलार यांना पुन्हा संधी नाही?विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि विद्यामान मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना पुन्हा संधी दिला जाणार नाही, अशी सूत्रांची माहिती आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार? बावनकुळे, शेलार यांना पुन्हा संधी नाही?
मुंबई /प्रतिनिधी- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. भाजपने महाराष्ट्रातील जिल्हा अध्यक्षांपैकी अनेक ठिकाणी नवीन चेहऱ्यांना चेहऱ्यांना दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अध्यक्षांची पुनर्रचना करण्यात आली. यानंतर आता प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष बदलण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. याची घोषणाही लवकरच केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि विद्यामान मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना पुन्हा संधी दिला जाणार नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. एक नेता, एक पद, एक जबाबदारी यानुसार इतरांना संधी दिली जाऊ शकते. आशिष शेलार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना पुन्हा अध्यक्षपद न मिळाल्यास प्रदेशाध्यक्ष पदासाठी रवींद्र चव्हाण आणि मुंबई अध्यक्ष पदासाठी प्रवीण दरेकर आणि साटम यांची नावे चर्चेत आहेत.
रवींद्र चव्हाण यांच्याकडे सध्या भाजप कार्यकारी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे रविंद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जाईल हे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता सर्वांना आहे.
प्रवीण दरेकर की अमित साटम?…
प्रवीण दरेकर हे सातत्याने भाजपजी बाजू मांडताना दिसत आहे. विरोधकांना भिडणारा भाजपचा आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात. विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदाचा तगडा अनुभव त्यांच्याकडे आहे. मुंबई बँकेचे अध्यक्षपद ही त्यांची जमेची बाजी आहे. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय मानले जातात.
तर दुसरीकडे अमित साटम यांना मुंबईच्या प्रश्नांची जाण आहे. विधानसभेतही मुंबईचे प्रश्न ते आक्रमकपणे मांडताना दिसतात. मुंबईतून आमदारकीची त्यांची तिसरी टर्म आहे. याशिवाय सुरुवातीपासून भाजपमध्ये असून दुसऱ्या पक्षातून आलेली नाहीत. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची निवड भाजपसाठी फायद्याची ठरु शकते.
समर्थकांची मागणी काय?..
विधानसभा आणि लोकसभा निवडणुका या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्त्वात पार पडल्या आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूकही चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या नेतृ्त्वाखाली झाल्या पाहिजेत. एकाएकी नेतृत्व बदल झाल्यास त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे, असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे.