भिवंडी लोकसभेतून निवडून आल्यावर कल्याण मुरबाड रेल्वे धावणार
ठाणे भिवंडी प्रतिनिधी/लक्ष्मण पवार- राज्यातून भाजप हटावचा निर्धार केलेल्या महाविकास आघाडीचे (INDIA) उमेदवार व पदाधिकारी, कार्यकर्ते देर-दुरुस्त लोकसभेच्या कामाला लागले असून भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे निर्णयाक विधानसभा मतदारसंघ मानले जाणाऱ्या मुरबाडमध्ये काल (रविवार दि. २२ रोजी) शहरातील खुले नाट्यगृह येथे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पत्रकाराशी बोलताना बाल्या मामा / सुरेश म्हात्रे यांनी सांगितले की दिल्ली वरून निघालेला भाजपा एबी फॉर्म मुंबईला आल्यावर बदलणार असे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संकेत दिले
या मेळाव्याच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी कोंग्रेस (SP) पक्षाच्या मुरबाड विधानसभाक्षेत्र अध्यक्ष शैलेश वडनेरे व काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे तसेच संपूर्ण कोंग्रेस पक्षाची दांडी दिसली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाचे नेते महेश तपासे, मुरबाड तालुकाध्यक्ष दीपक वाघचौडे, नामदेव गायकवाड, शहराध्यक्ष तेजस व्यापारी, शिवसेना (UBT) पक्षाचे नेते तथा उपजिल्हा प्रमुख मधुकर उर्फ आप्पासाहेब घुडे, सेनानेते बाळासाहेब चौधरी, मुरबाड तालुका प्रमुख संतोष विशे, विलास देशमुख, राजाराम निचिते, गणपत टावरे, आम आदमी पार्टीचे अॅड. नितीन देशमुख, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) मुरबाड तालुका महिला अध्यक्षा डॉ. कविता वरे, CITU संघटनेचे मुरबाड युनिट अध्यक्ष दिलीप कराळे, काशिनाथ वाघ यांचेसह शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. तर मनसे पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ धुमाळ, रमेश लिहे समवेत शिवसेना शिंदे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी मविआमध्ये जाहीर प्रवेश केला.
या मेळाव्याचे प्रास्ताविक कॉम. डॉ. कविता वरे यांनी आपल्या दणकेबाज शैलीत मांडले. यात दिल्ली येथे जाळण्यात आलेले संविधान, मणिपूरमध्ये काढण्यात आलेली महिलांची नग्न धिंड, किसान सन्मान निधी, गॅस वाटप अशा विविध मुद्द्यांचा उल्लेख करून संविधान पायदळी तुडवणारी प्रशासन व्यवस्था आम्हाला नको आहे, असा निर्धार मांडला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते महेश तपासे यांनी आपल्या भाषणातून, आम्ही कपिल पाटील नामक व्यक्ती विरोधात लढत नसून मोदी नामक विचारा सोबत आमची लढाई आहे. तसेच राम मंदिरावर भाष्य करतांना राम मंदिरची सर्वप्रथम परवानगी तत्कालीन काँग्रेस पंतप्रधान यांनी दिली, आम्हीही राम मानतो परंतु मात्र आमचा राम वेगळा आहे, तर भाजप संविधान बदलू पाहतोय, असा घणाघात करीत भाजपवर शाब्दिक तोफा डागल्या.
आम आदमी पार्टीचे अॅड. नितीन देशमुख यांनी आपल्या भाषणातून आमदार किसन कथोरे व खासदार कपिल पाटील यांच्यावर निशाण साधत आमदार व खासदार यांच्या वादविवादाचे कारण त्यांचे संस्कार आहे, मात्र पुन्हा भाजप सरकार आले तर हुकूमशाही आणि पारतंत्र्याला सामोरे जावे लागेल, असे वक्तव्य केले. तर तोडामोड करून भारतीय जनता पार्टी राजकारण करू पाहते, महागाई गगनाला भिडले, खासदार मोठं मोठे चॉकलेट देतात, असे व्यक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुरबाड तालुका प्रमुख संतोष विशे यांनी आपल्या भाषणातून केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुरबाड तालुका अध्यक्ष दीपक वाघचौडे यांनी मुरबाड तालुक्यातील एमआयडीसी, भिमाई स्मारक, राष्ट्रीय महामार्ग अशा विविध मुद्द्यांना हात घातला. सेनानेते मधुकर (आप्पासाहेब) घुडे यांनी मोदींवर निशाण साधत, मोदींनी हिटलरशाही सुरू केली असून आम आदमी पार्टीच्या प्रमुख केजरीवाल यांना त्यांनीच जेल मध्ये टाकल्याचे प्रतिपादित केले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अविनाश देशमुख यांनी, फडणवीस भांडण लावून त्यांच्या पक्षाचा भला करत आहेत, कथोरे आणि कपिल पाटील बदलापूर स्टेशनला भेटतात, तर खासदार पाटील एक चांगला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, वसतिगृह, शाळा ते आणू शकले नाहीत, किमान जो घरा समोरचा रास्ता ठीक करू शकले नाही, असा टिकांचा भडिमार यांनी यावेळी त्यांनी केला.
अंतिमतः महामेळाव्यास संबोधित करतांना मविआ उमेदवार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांनी कपिल पाटील यांचा ‘एक ही काम न केले निष्क्रिय खासदार’ अशा शब्दात परिचय करून देत भाषणाला सुरुवात केली. तसेच कल्याण हायवेवर भाष्य करत गेल्या १० वर्षात या रस्त्याचे रुंदीकरण का झालं नाही? शाही धरण व त्यातील ५३ गावे विस्थापित तसेच जागेच्या बदल्यात जागा आणि नोकरी या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. सोबत लोडशेडिंगचा मुद्दा, मुरबाड एमआयडीसी ६०-७०% बंद असून ३० ते ३५ हजार कोटींची केलेल्या कामांपैकी आमच्या एमआयडीसीला काही का दिले नाही? असा सवाल उपस्थित केला. सन २०१४ पासून रेल्वेचा अमिश आणि गाजर दाखवले, कपिल पाटीलांना फक्त श्रेय घ्यायची सवय आहे. पाटील सन २०१९ मध्ये दुसऱ्यांदा निवडून आले, सन २०२० मध्ये कोरोना काळात ३ महिने स्वतःचा दरवाजा बंद करून स्वतःचा घर सांभाळत राहिले, ३ महिन्यांनंतर घराबाहेर पडून कोरोनयोद्धा प्रशस्तीपत्र स्वीकारले, हा नीच पणाचा कळस आहे, मुरबाडमध्ये मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अपेक्षित, मुरबाड मुंबईपासून लगत असून लाईट, रस्ते या सुविधा नाहीत, इथल्या शेतमालला बाजार नाही, मी खासदार झालो तर इथल्या शेकऱ्यांना धान्य बाजार निर्माण करून देऊन व्यावसायासाठी भिवंडी, कल्याण येथे गाळा उपलब्ध करून देईन, भिवंडी मतदारसंघात ब्लु प्रिंट घेऊन निवडणूकीला उतलेलो मी एकमेव खासदार आहे, निवडून आल्यानंतर मी वर्षाला एक प्रेस कॉन्फरन्स घेईन व झाल्या विकासकामांचा आढावा देईन, तर मी तुतारीच्या चिन्हांवर निवडणूक लढतोय असे सुस्पष्ट केले. या महामेळाव्यास दांडी मारलेल्या काँग्रेसवर बाळ्यामामा उत्तरले. कोंग्रेसच्या दांडीवर बोलतांना बाळ्यामामांनी काँग्रेसला वरिष्ठांचा आदेश नाही हे कारण नाकारून नाराजी व्यक्त केली. अशा सबबी न मांडण्याचा आवाहन त्यांनी केले. रामभक्त आम्ही पण आहोत, पंरतु या रावणाला गडायचे असा शाब्दिक हल्ला भाजपवर केला.
मविआ (इंडिया) कडून आयोजित या मेळाव्याने होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीला चांगलीच कंबर कसलेली दिसून येत असून कार्यकर्ते पदाधिकारी देखील कामाला लागलेले पाहायला मिळत आहे. परंतु मविआचे बाळ्यामामा म्हात्रे (Balayamama Mhatre) व भाजपचे कपिल पाटील (Kapil Patil) यांच्यातील लढतीत अपक्ष उमेदवार निलेश सांबरे (Nilesh Sambare) देखील उडी घेणार असल्यास निवडणूक निकालाला नेमकं काय वळण लागते? यावर जोरदार चर्चा रंगली आहे.