तालुक्यातील अनागोंदी कारभारा विरोधात सन्मा.श्री नारायणजी राणे साहेब खासदार महोदय तसेच सन्मा. निलेशजी राणे साहेब माजी खासदार यांना प्रत्यक्ष भेटून योग्य ती कार्यवाही करण्या बाबत निवेदन देणार
माहितीचा अधिकारकार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्यचे रत्नागिरी जिल्ह्याचे वतीने 15 ऑगस्ट 24 रोजी स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणाचा जिल्हाध्यक्ष मनोहर गुरव यांचा इशारा..
रत्नागिरी- संगमेश्वर तालुक्यात सन्मा. पालकमंत्री महोदय ना.श्री उदयजी सामंत साहेब,सन्मा. आमदार श्री शेखरजी निकम साहेब यांनी संगमेश्वर तालुक्यात अनेक विकास कामांना निधी दिला.परंतु खरोखर विकास झाला का?.झालेल्या कामांची पहाणी झाली का?
आज तालुक्यात घरोघरी पाणी मिळण्यासाठी जलजीवन मिशन योजनेंतर्गत करोडो रुपयांचा निधी आणला गेला.पण आज यायोजने चा किती कुटुंबांना लाभ झाला. पावसाळा आला तरी कामे अपूर्ण आहेत.तर काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत.अनेक ढीगभर तक्रारी होऊन ही प्रतिनिधींनी लक्ष घातलेला नाही.जनतेने प्रश्न कोणाकडे काहीही मांडायचे?वरिष्ठ अधिकारी यांचेवर मेहर नजर असल्याने जनतेच्या प्रश्नांकडे, अर्जांकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे गेड्यांची कातडीचे अधिकारी असल्याने विकास कामांना खीळ बसली आहे.
वादग्रस्त अधिकारी असूनही त्यांची बदली करूनही तिथेच पुन्हा कार्यरत करणे याचा अर्थ काय होतो.यात कोण सहभागी आहेत.यांना पाठीशी का घातलं जातं.कारणे अनेक आहेत.
सुज्ञ नागरिक उत्तरे देतील यात शंका नाही.सन्मा.आमदार महोदय यांनी आचारसंहिता संपल्यावर तरी आमसभा घ्यावी अशी जनतेची मागणी आहे.
संगमेश्वर तालुक्यातील अनेक विकास कामांच्या व अधिकाऱ्यां च्या मनमानी कारभार विरोधात सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना व माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य चे रत्नागिरी जिल्ह्याचे वतीने 15 ऑगस्ट 24 रोजी स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष मनोहर गुरव यांनी सांगितले.