विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालात महायुतीनं मोठा विजय मिळवला. मात्र या निकालात ईव्हीएममध्ये मोठा गैरप्रकार केल्याचा आरोप बाबा आढाव यांनी करत आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं.
पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महायुतीला जोरदार यश मिळालं आहे. मात्र या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी एल्गार पुकारत आत्मक्लेश आंदोलन सुरु केलं आहे. ईव्हीएममध्ये मतदारांनी मतदान कोणत्या पक्षाला केलं, याचा पुरावा काय, असा सवाल बाबा आढाव यांनी विचारला आहे. सरकारकडून मोठी लूट सुरू असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. ज्यष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्या आत्मक्लेश आंदोलनाला भेट दिली, यावेळी बाबा आढाव हे बोलत होते.