
पावसाचा हाहाकार झोपेतच ५ जणांचा मृत्यू १०० जण अडकल्याची भीती
कर्जत खालापूर: सुमित क्षीरसागर
खालापूरमधील इर्शाळवाडी गावावर मध्यरात्रीच्या सुमारास दरड कोसळली,त्यात ५ जणांचा मृत्यू १०० जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.मातीच्या ढिगार्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू आहेत,युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे.२७ जणांना वाचवण्यात यश आल्याचे समजते.पाऊस आणि धुक्यामुळे मदत व बचाव कार्यात अडथळा होत आहे
पहा सविस्तर…..
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,पालकमंत्री उदय सामंत,मंत्री गिरीश महाजन,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार महेश बादली यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी दुर्घटनास्थळी भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातून दुर्घटनेचा आढावा घेतला.
मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून अनेक रेस्क्यू टीम या ठिकाणी कार्यरत आहेत.पाऊसही असल्याने बचावकार्यात प्रचंड अडथळे येत आहेत.शिवदुर्ग, निसर्ग मित्र, वेध सह्याद्री या टीम्स पोलीस प्रशासनाच्या मदतीने मदतकार्यात सक्रिय आहेत.रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू असून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.
