
दिवा: पहिल्याच पावसात दिव्यातील सकल भागातील घरात पाणी घुसल्याने दिव्यातील नालेसफाईची ठाणे महापालिका
आयुक्तांनी चौकशी करावी अशी मागणीआता नागरिकांमधून होत आहे. दिवा शहरातील प्रमुख नाले हे वेळीच
साफ न केल्याने व नाळ्यातील वाहून जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह मोकळा न केल्याने शहरातील अनेक बैठ्या घरांमध्ये
पावसाचे पाणी साचले. पाऊस पडल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेत्यांनी खाजगी जेसीबी लावून अनेक ठिकाणी नाले साफ करून दिले मग प्रशासनाने नेमकं काय काम केले ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
दिव्यातील नालेसफाईची आयुक्तांनी चौकशी करावी,
दिव्यातील नागरिकांची मागणी नालेसफाईचा निधी नेमका कुठे गेला….याची चौकशी आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी नोंदवले आहे. नालेसफाई न झाल्याने अनेक नागरिकांना
त्रास सहन करावा लागला. बैठ्या चाळीतील घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिक अक्षरश: हैराण झाले होते. दिवा शहरात
आजही अनेक मध्यमवर्गीय चाळीत राहतात. नाल्यांची सफाई न झाल्याने, त्याच बरोबर काही ठिकाणी नाल्यातील गाळ काढून तो त्याच ठिकाणी ठेवल्याने पुन्हा नाले भरले. नालेसफाईच्या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याबरोबर
दिवा शहरातील नालेसफाईची चौकशी व्हावी अशी मागणी आता दिवा शहरातील नागरिक करत आहेत.
जाहिरात
