सहाय्यक महसुल अधिकारी राजाराम शिंदे व शिपाई पेंढारी नियम वयोमानानुसार सेवानिवृत्त…

Spread the love

*राजापूर / प्रतिनिधी –* राजापूर तहसीलदार कार्यालयतील सहाय्यक महसूल अधिकारी पदावर कार्यरत असलेले राजाराम शिंदे (माजी सैनिक) तसेच राजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील शिपाई पदावर कार्यरत असलेले  सुरेश पेंढारी, हे दिनांक 31/05/2025 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त नुकताच त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.
        

यापूर्वी श्री. शिंदे हे  सन 1984 पासून भारतीय सैन्यदलात कार्यरत होते.  सन 2000 साली ते हवालदार या पदावरुन सेवानिवृत्त झाले.
                  
तद् नंतर  श्री. शिंदे हे  महसूल विभागात सन 2005 साली  लिपिक टंकलेखक या पदावर रुजू झाले. श्री. शिंदे यांनी सन 2005 ते 2010 तहसीलदार कार्यालय संगमेश्वर, 2010 ते 2012 तहसीलदार कार्यालय, खेड तसेच 2012 ते 2025 अखेर तहसीलदार कार्यालया राजापूर येथे सेवा बजावली. सन 2018 साली त्यांना अव्वल कारकून (सहाय्यक महसूल अधिकारी ) म्हणून पदोन्नती मिळाली असून, ते 2018 पासून गोदाम व्यवस्थापक राजापूर या पदावर कार्यरत होते.
                   
श्री. पेंढारी यांनी सन 1995 ते 1996 जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी , सन 1996 ते 2015 तहसीलदार कार्यालय, राजापूर तसेच सन 2015 ते 2025 येथे सेवा बजावली.

उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच तहसीलदार कार्यालयाच्यावतीने नुकताच शिंदे व पेंढारी यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. निरोप समारंभानिमित्त तहसीलदार कार्यालयातील मंकरंद प्रभुलकर, शंकर गाड, मंगेश परांजपे, आदीनी आपली मनोगते व्यक्त केली.
                      

सदर कार्यक्रमाला डॉ. जॅसमिन, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राजापूर तसेच विकास गंबरे, तहसीलदार राजापूर हे उपस्थित होते. तसेच राजापूर शहरातील अनेक मान्यवरांनीदेखील दोघांना शुभेच्छा दिल्या.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page