आषाढी एकादशी 2024; ‘या’ राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, वाचा राशीभविष्य…

Spread the love

आषाढी एकादशी 2024; ‘या’ राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, वाचा राशीभविष्य…

आषाढ महिन्यात योणारी एकादशी तिथी देवशयनी एकादशी आणि आषाढी एकादशी म्हणून ओळखली जाते. आज आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशी हा मुळातच एक शुभ योग आहे. या दिवशी आणखी काही शुभ योग्य तयार होत आहेत, ज्याचा लाभ काही राशींना होणार आहे. ते योग कोणते आहेत पाहूयात.

मेष (ARIES) : आज आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2024) आहे. आज चंद्र वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आज उक्ती आणि कृती ह्यावर संयम ठेवणे तसेच राग द्वेषापासून दूर राहणे हिताचे राहील. गुप्तशत्रूंचा त्रास संभवतो. रहस्यमय आणि गूढ विषयांचे आकर्षण राहील. शक्यतो प्रवास टाळा. प्रवासात अनपेक्षित अडचणी उदभवतील. नवीन कार्ये हाती घेतल्यास त्यात सुद्धा अडचणी येतील. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल.

वृषभ (TAURUS) : आज चंद्र वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज संसारात, दांपत्य जीवनात सुख-शांती अनुभवाल. कुटुंबीय आणि निकटचे मित्र यांच्या सह उत्तम भोजनाचा आस्वाद घ्याल. एखाद्या जवळच्या प्रवासाचे नियोजन कराल. प्रकृती उत्तम राहील. धनलाभ होईल. दूर राहणार्‍या स्नेह्यांकडून येणारी बातमी आपणास खुश करील. भागीदारीत लाभ व सार्वजनिक जीवनात मान-सन्मान मिळेल.

मिथुन (GEMINI) : आज चंद्र वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज आपली अपूर्ण कामे पूर्ण होतील. त्यात मनासारखे यश मिळेल. घरातील शांती व समाधानाचं वातावरण मनाला प्रसन्न ठेवेल. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक लाभ होईल. कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील. सावधानता बाळगा.

कर्क (CANCER) : आज चंद्र वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजच्या दिवसाची सुरूवात चिंता आणि उद्वेगाने होईल. आरोग्याच्या तक्रारी पण राहतील. नवे काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. अचानक धन खर्च होईल. वाद-विवाद होऊन मतभेद किंवा बोलाचाली होईल. एखादी मानहानी संभवते. प्रवासात अडचणी येतील.

सिंह (LEO) : आज चंद्र वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चौथ्या स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. घरात वाद होतील. कुटुंबात अशी एखादी घटना घडेल की, त्यामुळं आपणास दुःख होईल. अस्वस्थ रहाल. मन व्यग्र राहील. नकारात्मक विचारांमुळं आपणास त्रास होईल. आईचे आरोग्य बिघडेल. शांत झोप लागणार नाही. अती संवेदनशील व्हाल. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. अपघाताची शक्यता असल्यानं शक्यतो पाण्यापासून दूर राहावे. नोकरीतील वातावरण चिंताग्रस्त राहील. संपत्तीच्या व्यवहारात सावध राहावे लागेल.

कन्या (VIRGO) : आज चंद्र वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज कोणत्याही कार्यात विचारपूर्वकच सहभागी व्हावे. बरोबरीच्या लोकांमध्ये वेळ चांगला जाईल. भावनात्मक संबंधातून हळवे व्हाल. आप्तेष्ट व मित्रांचा सहवास घडेल. भावंडाकडून फायदा होईल. शत्रूचा सामना करू शकाल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल.

तूळ (LIBRA) : आज चंद्र वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपली मनःस्थिती द्विधा झाल्यानं आपण कोणत्याही बाबतीत ठाम निर्णय करू शकणार नाही. अशा परिस्थितीत नवीन कामाची सुरवात न करणे हितावह राहील. संबंधितांशी मतभेद संभवतात. व्यवहारात हट्टीपणा सोडावा लागेल. प्रवासात अडचणी येतील. आर्थिक लाभ होईल. कुटुंबियांशी वाद संभवतात. शक्यतो आज कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस साधारणच आहे. तन, मनाला सुख, आनंद मिळेल. कुटुंबियांसह उत्साहात व आनंदात वेळ घालवाल. मित्रांकडून भेटवस्तू मिळाल्यानं मनाला आनंद होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. एखादी आनंददायी बातमी मिळेल. प्रवास सुखद होतील. उत्तम वैवाहिक सुख उपभोगता येईल.

धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस कष्टदायी आहे. कुटुंबियांशी मतभेदाचे प्रसंग उदभवतील. स्वभावात रागीटपणा येऊन वाद होतील. आरोग्यास त्रास संभवतो. वर्तन व बोलणं संयमित ठेवावे लागेल. एखादा अपघात संभवतो. खर्चात वाढ होईल. कोर्ट-कचेरीचे प्रश्न काळजीपूर्वक सोडवावे लागतील. फुटकळ कामातून मनःशांती भंग पावेल.

मकर (CAPRICORN) : आज चंद्र वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज विविध क्षेत्रातून लाभ होण्याचा दिवस असल्यानं सामाजिक कार्यांतून लाभ होईल. मित्र, स्नेही यांच्या भेटीतून लाभ होईल. विवाहोत्सुकांचे विवाह सहज जुळतील. शुभ प्रसंगाचे आयोजन घडेल. पत्नी, संततीचा सहवास लाभेल. खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. शेअर बाजारातून फायदा होईल. पत्नीच्या स्वास्थ्याविषयी चिंता निर्माण होईल.

कुंभ ( AQUARIUS) : आज चंद्र वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आज आपले प्रत्येक काम सहजपणे पार पडेल. त्यामुळे आनंदी राहाल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहील. त्यामुळं मोठं यश मिळू शकेल. वरिष्ठ आणि वडीलधार्‍यांचे आशीर्वाद मिळाल्यानं मनावरील ताण कमी होईल. गृहजीवन आनंदी राहील. मान-मरातब वाढतील.

मीन (PISCES) : आज चंद्र वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. मनातील दुःख आणि अशांतता ह्याने आजच्या दिवसाची सुरुवात होईल. शारीरिक थकवा जाणवेल. वरिष्ठांशी वाद संभवतात. संततीविषयी काळजी सतावेल. निरर्थक खर्च होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद टाळा. पोटाची तक्रार राहील. नशिबाची साथ लाभणार नाही. मनात नकारात्मक विचार येतील.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page