
रत्नागिरी : कोतवडे येथे धरणाची केंद्रीय मार्ग निधी (CRF) अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील आणि तालुक्यातील तिरवाड वेतोशी कोतवडे ते प्रजिमा-५५ ला मिळणार रस्ता आरे बसणी शाखेसह प्रजिमा -५८ कि.मी. १२/७६० मध्ये कोतवडे नदीवर लहान पुलाचे बांधकाम करणे. या कामाचे उदघाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कार्यक्रमाचा उद्घाटनाची विकासकामांची लावण्यात आलेली पाटी यामध्ये शिवसेनेच्या अनेक लहान मोठ्या कार्यकर्त्यांची नावे टाकण्यात आली मात्र सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण यांचे नाव टाकण्यात आले नव्हते.
तर केंद्रीय मार्ग निधी यातून हे काम होत आहे याचा देखील यात उल्लेख करण्यात आला नव्हता. जिल्ह्यामध्ये होत असलेल्या विविध कामांमध्ये केंद्र सरकार आणि भारतीय जनता पार्टीचा मोठा वाटा असतो मात्र याचे श्रेय कोणीतरी लाटत असल्याची खदखद भाजपच्या गोठाच व्यक्त केली जात आहे.
युती असूनही भाजपाला डावलण्याचा प्रयत्न शिदे सेनेकडून रत्नागिरीत चालू असल्याचे बोलले जात आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त करताच मंत्री रवींद्र चव्हाण यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले आणि सदरच्या उद्घाटनाची पाटी बदलण्यात आली असे बोलले जात आहे.