
रत्नागिरी : शहरात मिशन कॅम्प ते गवळीवाडा रस्त्यावर गस्त घालताना एका प्रौढाला गांजा बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई बुधवारी करण्यात आली. जहीर मेहमूद काजी (वय ४५, रा. गवळीवाडा, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. या कारवाईत १५ हजारांचा ५३९ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. गस्तीदरम्यान पोलिसांना जहीर काजी हा दुचाकीवर संशयास्पद हालचाली करताना दिसला. पोलिसांनी संशयावरून त्याला थांबवून चौकशी केली. त्यावेळी पिशवीमध्ये गांजा सापडला. गांजासह दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे.
ही यशस्वी कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलिस उपनिरीक्षक ओगले, हवालदार शांताराम झोरे, बाळू पालकर, अमित कदम, योगेश नार्वेकर, योगेश शेट्ये आणि महिला हवालदार वैष्णवी यादव यांनी केली आहे)