
श्रीकृष्ण खातू / धामणी – फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धामणी येथील देवी वाघजाई मंदिरात नूतन मूर्ती प्रतिष्ठापना अनुषंगाने भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यासाठी गोव्याहून बनवून आणलेल्या नूतन देवी मूर्तीचे धामणी गावात आगमन झाल्यावर फुलांनी सजवलेल्या गाडया,ओवाळणी करणाऱ्या सुहासिनी, ढोल, ताशे,सनई, हरिपाठ वारकरी दिंडीने वाजत गाजत, नृत्याचा ठेका धरून देवीची शोभायात्रा काढण्यात आली. या चार तास चाललेल्या आनंदमय सोहळा दिंडीमध्ये संगमेश्वर तालुक्याचे माजी आमदार सुभाषजी बने साहेब सहभागी होऊन देवीवरील असलेली व श्रद्धा भक्तीने देवी जवळ नतमस्तक झाले. भक्तांचा जल्लोष पाहून भारावले.व सहभागी दिंडी मधील सर्व भक्तजनांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.




त्यांच्या समवेत विवेक शेरे, प्रभाकर घाणेकर, अमोल लोध, हरिश्चंद्र गुरव, प्रकाश रांजणे , रामचंद्र बांबाडे श्रीनिवास पेंडसे, अप्पा पाध्ये, हरी बडद, प्रणव वाकणकर योगेश पाध्ये विवेक पाध्ये सागर गुरव, सुरेश साळवी दत्ताराम गुरव भालचंद्र सप्रे, संतोष काणेकर, संगम पवार आदी भक्तजन मोठ्या भक्ती भावाने सहभागी झाले होते.
यानंतर मंदिरात शोभायात्रा पोहोचल्यावर उद्योजक प्रभाकर घाणेकर यांच्या सौजन्याने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाचा लाभ घेऊन शोभा यात्रेची सांगता करण्यात आली.