जयगड बंदरांच्या विस्तार आणि  पायाभूत सुविधांचा विकास आराखडा मान्यता….

Spread the love

*रत्नागिरी :* तालुक्यातील जयगड येथील जेएसडब्ल्यू समुहातील कंपनी जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील जयगड आणि धरमतर या बंदरांच्या क्षमता विस्तारासाठी २.३५९ कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीला सोमवारी मान्यता दिली. जयगड बंदरासाठी रेल्वे साइडिंगसारख्या अतिरिक्त पायाभूत सुविधांच्या विकसनाचाही यात समावेश आहे. त्यामुळे अनेक वर्षे थबकलेला डिंगणी-जयगड रेल्वे मार्गाला चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सध्या माल हाताळणी क्षमता १७० दशलक्ष मेर्ट्रीक टन इतकी आहे. आर्थिक वर्ष २०३० पर्यंत प्रति वर्ष ४०० दशलक्ष टनांपर्यंत वाढ करण्याची कंपनीची योजना आहे. त्याचा एक भाग म्हणून हा क्षमता विस्तार हाती घेण्यात आला आहे. प्रस्तावित भांडवली गुंतवणुकीतून प्रती वर्ष ३६ दशलक्ष टनांची क्षमतेत भर पडणे अपेक्षित असून जयगड बंदराच्या क्षमतेत १५ दशलक्ष टनांची तर धरमतर बंदाराच्या क्षमतेत वार्षिक २१ दशलक्ष टनांनी वाढ होईल असा अंदाज आहे. विस्तार योजनेत नवीन धक्क्यासाठी यांत्रिक नागरी व इलेक्ट्रीकल कामांचा समावेश आहे. व तृतीय -पक्षाच्या मालवाहतुकीला चालना देण्यासाठी जयगड बंदारासाठी रेल्वे साइडिंगसारख्या अतिरिक्त पायाभूत सुविधांच्या विसनानाही यात समावेश आहे. कांपनीने निवेदनात दिलेल्या माहितीनुसार विसारापश्तात जयगड बंदराची एकूण क्षमता सध्याच्या वार्षिक ५५ दशलक्ष मेट्रीक टनांवरुन ७० दशलक्ष टनांवर जाईल आणि धरमतर बंदराची क्षमता सध्याच्या वार्षिक ३४ दशलक्ष मेट्रिक टनावरुन ५५ दशलक्ष मेट्रिक टनांपर्यत वाढेल दोन्ही बंदराच्या विस्तारामुळे अंदाजे वार्षिक २७ दशलक्ष मेट्रीक टनांपर्यत अतिरिक्त माल हाताळणी क्षमता निर्माण होऊ शकेल. दोन्ही बंदरांबाबत प्रस्तावित विस्तार योजनेतील बांधकाम मार्च २०२७ पर्यत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. डिंगणी-जयगड रेल्वे मार्गाचे भूसंपादन पूर्ण झाले असून काही प्रमाणात उभारणीची सुरवात झाली होती. या नंतर काही कारणाने हे काम थांबले आता जेएसडब्ल्यू निधी मंजूर केल्याने मार्गाचे काम पुढे जाईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page