
जनशक्तीचा दबाव न्यूज | लांजा | ऑक्टोबर २१, २०२३.
प्रसिद्ध उद्योजिका श्रीम. परीणीता सावंत यांनी राजापूर भाजपा नेत्या सौ. राजश्री (उल्का) विश्वासराव यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये नुकताच प्रवेश केला होता. त्यांच्या राजकीय अनुभवाची योग्य दखल घेत आता त्यांच्याकडे लांजा तालुका महीला मोर्चाची धुरा सोपवण्यात आली आहे.
भाजपा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभेच्या सह-प्रमुख सौ. उल्का विश्वासराव यांच्या नेतृत्वात मतदारसंघात भाजप संघटना मजबूत होत असून अनेक पक्षप्रवेश मोठ्या धडाक्यात होत आहेत. परीणीता सावंत यांचा दांडगा अनुभव, संघटन कौशल्य आणि कामाचा आवाका पाहून त्यांना लांजा महिला मोर्चा तालुकाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. त्यांना नियुक्तीपत्र देताना सौ. विश्वासराव यांच्यासोबत लांजा तालुकाध्यक्ष श्री. चंद्रकांत मांडवकर, जिल्हा सरचिटणीस श्री. अमित केतकर, ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. सुरेशशेठ गांधी, श्री. संतोष चव्हाण सर, श्री. श्रीकांत ठाकूरदेसाई, श्री. कमलाकर शिवगण, श्री. प्रथमेश बेंडल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.