देवरूख- संगमेश्वर तालुक्यातील मुरादपूर गावचे उद्योजक, समाजसेवक सचिन आत्माराम बांडागळे यांची भाजपा संगमेश्वर दक्षिण तालुका सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपाचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष रुपेश कदम यांनी आपल्या तालुका कार्यकारणीत मुरादपुर मधील युवा नेतृत्व श्री. सचिन बांडागळे यांच्याकडे तालुका सरचिटणीसपदाची जबाबदारी दिली आहे. सचिन बांडागळे यांचा राजकीय अभ्यास, भाजपा पक्ष वाढीसाठी तसेच प्रत्येक समाजातील सामाजिक काम करण्याची असणारी त्यांची तळमळ लक्षात घेता भविष्यकाळात तालुक्यातील भाजपा पक्ष वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पक्षाला साथ लाभेल.
पक्षाने माझ्यावर दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेल. भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी, राज्याचे उपमुखयमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे विचार, त्यांची विकासात्मक धेय धोरणे, तालुक्यातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवून तालुक्यांतील प्रत्येक समाजातील लोकांच्या अडी अडचणी सोडवण्याचा अतोनात प्रयत्न करेन असे मत सचिन बांडागळे यांनी व्यक्त केले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या तालुक्यातील सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांना शुभेच्छा देत जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद अधटराव, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अभिजित शेट्ये व तालुकाध्यक्ष रूपेश कदम, देवरूख शहर अध्यक्ष सुशांत मुळ्ये तसेच भरतीत जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले.