रत्नागिरी:- शासनातंर्गत भात खरेदी योजना 2023 -24 मध्ये रत्नागिरी व संगमेश्वर तालुक्यासाठी भात खरेदी एजंट म्हणून रत्नागिरी जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संघ लिमिटेड यांची नियुक्ती झाली आहे.
दिनांक 21 डिसेंबर रोजी भात खरेदी केंद्राचे उद्घाटन संघाचे अध्यक्ष श्री बाबाजी जाधव यांच्या हस्ते व उपाध्यक्ष श्री. सुरेश खापले , संचालक सर्वश्री अशोक कदम, दत्ताराम जाधव, परवेश घारे, अफझल पाटणकर, संतोष लाड, तुकाराम गुरव , सुभाष जाधव संचालिका सौ. पूजा शेखर निकम, सौ. ऋतुजा उमेश कुळकर्णी तसेच मार्केटिंग अधिकारी श्री चिले साहेब यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
सौ. निकम व सौ. कुळकर्णी यांच्या हस्ते वजन काट्याची पूजा करण्यात आली. त्यानंतर संघाने शासन नियमानुसार प्राप्त झालेले भात पोते वजन केले.
चालू वर्षी सर्वसाधारण भाताचा दर क्विंटलला रुपये 2183/- निश्चित झालेला असून भाताची रक्कम मार्केटिंग फेडरेशन मार्फत बँकेत परस्पर जमा होणार आहे शेतकऱ्यांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन मुदत दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत आहे तसेच भात खरेदी सुद्धा सुरू झालेली आहे तरी भात शेतीचा सन २०२३-२४ भाताची नोंद असलेला सातबारा, आधार कार्ड व बँकेचे पासबुक (केवायसी )झालेले आवश्यक आहे तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वच्छ व चांगल्या दर्जाचे भात संघाकडे विक्रीसाठी देऊन शासन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन संघाकडून करण्यात येत आहे. बुरशीयुक्त लालदाना मिश्रित व खराब भात खरेदी केले जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी रत्नागिरी जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संघाचा दूरध्वनी क्रमांक 02352 222459 / 299993 तसेच संगमेश्वर सेंटर दूरध्वनी क्रमांक 9420909470 यावर संपर्क साधावा असे आवाहन संघाचे अध्यक्ष श्री. बाबाजी जाधव यांनी केले आहे.