
मुंबई : पासपोर्ट नुतनीकरणासाठी तब्बल 1 लाख 85 हजार रूपयांची लाच मागण्यात आली.तडजोडीनंतर 85 हजाराचा व्यवहार ठरला.लाचेचा पहिला 45 हजाराचा हफ्ता घेताना एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.तक्रारदाराच्या पासपोर्टचे नुतनीकरण करायचे होते.नुतनीकरणात काही तांत्रिक कारणांमुळे त्यांच्या पासपोर्ट बीकेसी बांद्रा येथील पासपोर्ट कार्यालयात प्रलंबित होता.त्यावेळी आरोपी एंजट शेखर नेवे ( रा.मुंबई) यांने तुमचे काम करून देतो सांगून बीकेसी बांद्रा येथील पासपोर्ट कार्यालयातील डाटा ऑपरेटर प्रकाश मंडल यांना 1 लाख 80 हजार रूपये आणि स्वतःसाठी 5 हजार रूपयांची लाच मागितली.त्यानंतर झालेल्या तडजोडीअंती डाटा ऑपरेटर प्रकाश मंडल यांना 80 हजार आणि स्वतःकरिता पाच हजार रूपये असा व्यवहार नेवे याने ठरवला.त्यानुसार पहिला हफ्ता देण्याचे ठरले.डाटा ऑपरेटर प्रकाश मंडल याला 40 हजार आणि शेखर नेवे याला 5 हजार रूपये असा व्यवहार ठरला.पैसे घेण्यासाठी शेखर नेवे रत्नागिरी रेल्वे स्थानकाजवळील एका हॉटेलात आला होता.तेव्हा त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.त्यानंतर तातडीने डाटा ऑपरेटर प्रकाशकुमार झरी मंडल याला मुंबईत अटक करण्यात आली.