केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा; ३४ जणांना पद्मश्री..

Spread the love

नवीदिल्ली- प्रजाकसत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला यंदाच्या वर्षी दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. विविध क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात येतो. यंदाच्या वर्षी ३४ व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार देण्याची घोषणा झाली आहे. यात पार्वती बरुआ, जागेश्वर यादव, चार्मी मुर्मू, सर्वेश्वर, सांगथामसहित अनेक इतर मान्यवर व्यक्तीच्या नावांचा सामावेश आहे. यात मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

पद्म पुरस्कार भारतातील सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न पुरस्कारानंतर महत्वपूर्ण पुरस्कार मानला जातो. पद्म पुरस्कार हा पद्म विभूषण, पद्म विभभूषण, पद्मश्री अशा तीन श्रेणीत दिला जातो. केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कार पुरस्कार देण्याची सुरुवात १९५४ पासून सुरुवात केली. पुढे १९५५ साली पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण असं नामकरण करण्यात आलं. यंदाच्या पद्म पुरस्कारांची नावे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे. यावर्षी ३४ जणांना सरकारने पद्मश्री देण्याचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये पार्वती बरुआ, जागेश्वर यादव, चामी मुर्मू, गुरविंदर सिंग, सत्यनारायण बेलारी, दुखु माझी, के. चेलम्माल, संगथनकिमा, हिमचंद मांझी, यनुंग जेमो, सोमन्ना, सर्वेश्वर बी., प्रेमा धनराज, उदय देशपांडे, वाय. इटालिया, शांती देवी पासवान आणि शिवन पासवान, रतन कहर, अशोक कुमार बी., बाळकृष्ण वेल्ली, उमा माहेश्वरी, गोपीनाथ एस., स्मृती रेखा चक्मा,ओमप्रकाश शर्मा, नारायण ईपी, भागवत प्रधान, एस.आर. पाल, बद्रापन एम., जॉर्डन लेप्चा, एम. सासा, जानकीलाल, डी. कोंडप्पा, बाबू राम यादव, नेपाल चंद्रा यांचा समावेश आहे. पार्वती बरुआ या भारतातील पहिल्या महिला हत्ती माहुत आहेत. त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच झारखंडमधील जशपूर जिल्ह्यातील आदिवासी कल्याण कार्यकर्ता जागेश्वर यादव यांनाही पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page