श्रीकृष्ण खातू /धामणी – ३७ वर्षापूर्वी शिक्षण खात्यात शिक्षक म्हणून रुजू होऊन प्राथमिक शिक्षक ,पदवीधर शिक्षक ,अशा पदावर इमानाने सेवा करून शाळा म्हणजे केवळ दगड, विटा, मातीच्या भिंती नसून तर ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी, व प्रशासन यांच्याशी समन्वय ठेवूनच शिक्षकाला शाळेमध्ये विद्यादान करावे लागते. अशा ३७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी अंकुश गुरव पदवीधर शिक्षक हे सेवेतून निवृत्त होत असल्याने त्यांचा अभिष्टचिंतन सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होतें. हा सोहळा शाळा धामणी नंबर २ येथे धामणी केंद्र व अंत्रवली केंद्र तसेच व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित करून अंकुश गुरव यांचा सपत्नीक सत्कार केंद्र प्रमुख जंगम व सर्व शिक्षकांच्या हस्ते करण्यात येऊन यथोचित सन्मानित करण्यात आले.
अंकुश गुरव यांचे योगदान व निष्ठेने केलेली शिक्षक सेवा या विषयी प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक रमेश गोताड यांनी मनोगत व्यक्त करताना अंकुश गुरव यांनी शिक्षणासाठी घेतलेले कष्ट, व त्यातून मिळालेले प्राविण्य यांच्या जोरावर शिक्षक होऊन ज्ञान देण्याचं काम उत्कृष्टपणे पार पाडले असे नमूद केले. त्याच बरोबर हॉटेल श्रद्धा चे मालक मालक प्रभाकर घाणेकर यांनीही गुरव यांचा वक्तशीरपणा,नियोजन, अशा कामाबद्दल गौरव उदगार काढून शुभेच्छा दिल्या.
त्याचप्रमाणे श्रीकृष्ण खातू, अशोक टाकळे, दिलीप महाडीक, रुपेश जाधव,प्रकाश गेल्ये कारभारी वाडेकर, संदिप गायकवाड़, शेळके, जयंत शिंदे, सराटे,संजय कुंभार, सुभाष जाधव, रसिका शिंदे यांनी त्यांचे अनुभव आपल्या मनोगतातून उल्लेख करून त्यांच्या पुढील आयुष्य व आरोग्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
शिक्षक व हितचिंतक यांनी केलेला गौरव तसेच सन्मान यामुळे अंकुश गुरव भारावून गेल्याचे नमूद करून सत्काराला उत्तर देताना गुरव यांनी आलेले अनुभव व वेगवेगळ्या मार्गाने मिळालेले सहकार्य याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सत्काराबद्दल धन्यवाद व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी धामणी व अंत्रवली केंद्राचे केंद्रप्रमुख भास्कर जंगम,रमेश गोताड, रमेश गुरव,वैभव गुरव,नयना गुरव, प्रभाकर घाणेकर, अशोक टाकले,सुरेखा कांबळे, गंगाराम शेळके ,संदिप गायकवाड़, नितीन थेराडे, हरिश्चंद्र गुरव सुरेश साळवी, रामचंद्र बांबाडे,जयंत शिंदे,सुभाष जाधव,संजय कुंभार,प्रकाश गेल्ये,विवेक पोंक्षे तसेच दोन्ही केंद्रातील शिक्षक, शा.व्य.समिती सदस्य तसेच दोन्ही केंद्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनी, शाळेतील विद्यार्थी वर्ग उपस्थित होतें. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन मधुकर सानप यांनी केले.