पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने शोधकार्यात येताआहेत अडथळे…
माणगाव/प्रतिनिधी:- माणगाव खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्मला नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून एक वयोवृद्ध युवक पुरात वाहून गेला आहे दत्ता भोई नामक युवक येथील मसोबा घुमटी देवस्थानाकडे दररोज येत होता अचानक नदीला पूर आल्याने नदीचा प्रवाह वाढल्याने युवक वाहून गेला आहे घटनेची माहिती मिळतात कुडाळ तहसीलदार, महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून शोधकार्य सुरू आहे काल शनिवारपासूनच संततधार पाऊस कोसळत असल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत जनजीवन विस्कळीत झाले असून माणगाव आंबेरी नदीवरून ये जा करणाऱ्या 37 गावांचा संपर्क तुटला आहे