लांजा : लांजा तालुक्यात प्रथमच कुरंग येथे नावीन्यपूर्ण असा कमानी पूल साकारला जात आहे. या पुलाचे काम प्रगती पथावर आहे. कमानी पद्धतीचा (Arch Type) पूल आहे. त्याचे ड्रॉइंग मॉडर्न आर्च इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने बनवले आहे. या पुलाला दोन गाळे असून, पावसाचे पाण्याने वाहतुकीस काहीही अडचण येणार नाही, असे त्याचे डिझाईन आहे.
पुलाच्या बांधकामामुळे कुरंग गावातील ग्रामस्थांना पावसाळ्यात वाहतुकीची अडचण येणार नाही. सहयाद्री पायथ्याशी असलेल्या कुरंग गावात पावसाळ्यात येथील वरची वाडी, कदमवाडी आदी वाडी ,वस्ती चा दळणवळण चा संपर्क तुटत असे ग्रामस्थांची पुरामुळे मोठी गैरसोय होत असे. अनेक वर्षची पुलाची मागणी ची पूर्तता होत आहे आर्च कमानी पूल ही पद्धत किफायतशीर आहे. अभियांत्रिकीचा हा नाविन्यपूर्ण असा पद्धत आहे. पुलाची लांबी 30 मीटर आणि उंची 4.3 मीटर आहे. लांजा तालुक्यातील कुरंग गावामध्ये नावेरी नदीवर कमानी पद्धतीचा (Arch Type) पूल साकार होत आहे.
या पुलासाठी रू. 111.54/- (1कोटी 11 लाख इतका खर्च अपेक्षित आहे. पुलाच्या बांधकामामुळे कुरंग गावातील ग्रामस्थांना पावसाळ्यात वाहतुकीची अडचण येणार नाही.ब-याच वर्षाच्या प्रतिक्षेत असणारा पूल मार्गी लागत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. या पध्दतीचा पूल रत्नागिरी जिल्हायात प्रथमच बांधण्यात आला असल्याचे अधिकारी यांनी पत्रकारांना सांगितले.
गेली बरीच वर्षे कुरंग गावामध्ये पुलांची मागणी ग्रामस्थांनी केली होती नावेरी नदीच्या दोन्ही बाजूला कुरंग गावाची वस्ती आहे. आरोग्य केंद्र असल्याने पावसाळ्यात तर वाहतुकीची मोठी अडचण भासत असे या नदीवर साकव होता साकवावरून ये जा करणे धोकादायक होते. गाडी वगैरे जाण्यासाठी येथील ग्रामस्थांनी पुलांची मागणी केली. . सातत्याने पाठपुरावा करण्यात आला या कामी: . प्रमोद भारती, उपविभागीय अधिकारी, सा. बां. उपविभाग,लांजा श्री. अमोल ओठवणेकर, कार्यकारी अभियंता, सा. बां. विभाग, उत्तर रत्नागिरी यांनी जातिनिशी लक्ष दिले.
या पुलाची लांबी – 30 असुन: पुलाची उंची – 4.3 मी इतकी आहे.या फुलांचे अर्धेअधिक काम पुर्ण झाले असुन काही दिवसात या फुलांचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. कमानी पध्दतीचा पहीलाच पुल लांजा तालुक्यात बांधण्यात आला आहे.सदर पुलातून पाण्याचा विसर्ग होण्यासाठी दोन गाळे असल्याने अतिवृष्टीमुळे या फुलाला पाण्याचा धोका होणार नसल्याचे सांगितले.