राम मंदिर बांधण्यास काँग्रेसचा विरोध; अमित शाह यांनी साधला विरोधकांवर निशाणा….

Spread the love

अकोला येथे महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ अमित शाह यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी अनुप धोत्रे यांना विजयी करायचं आहे, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय.

अकोला : अकोल्यातील भाजपाचे उमेदवार अनुप धोत्रे (Anup Dhotre) यांच्या प्रचारासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची अकोल्यात जाहीर सभा आयोजित घेण्यात आली. या सभेत अमित शाहनी काँग्रेसवर सडेतोड टीका केली. शहरातील अकोला क्रिकेट क्लब मैदानावर ते बोलत होते. सभेत अमित शाहसह भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांचे नेते मंचावर उपस्थित होते.

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा…

अमित शाह यांनी आपल्या भाषणातून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केलीय. राम मंदिर (Ram Mandir) न बांधण्यात यावं, अशी विरोधकांची इच्छा होती. मात्र, ते मोदींनी बांधून दाखवलं, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सांगितलं. मोदी यांनी देशातील प्रत्येक घटकाला त्यांनी न्याय दिला आहे. देशातील मोठे प्रोजेक्ट सुरू असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली या देशातील रस्ते विकसित झाले आहे. यासोबतच त्यांनी शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. तसेच उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलासाठी शिवसेना फोडली त्यांना मुलाशिवाय काही दिसत नाही, असा टोला त्यांनी लगावला. शरद पवार हे दहा वर्षे केंद्रात होते. त्यांना केंद्रानं महाराष्ट्र विकासासाठी किती निधी दिला हे त्यांनी सांगावं, असा प्रश्न त्यांनी भर सभेत शरद पवार यांना विचारला. तर भाजपानं केंद्र सरकारमध्ये असताना दहा वर्षात काय केलं याचा हिशोब देत आहोत.

मोदींनी भारताला 5 व्या क्रमांकावर आणलं…

काँग्रेस सरकारनं भारताला 11 व्या क्रमांकावर सोडलं होत. तर मोदींनी 5 व्या क्रमांकावर भारताला आणलं. आपण जर पुन्हा मोदींना निवडून दिलं तर ते भारताला तिसऱ्या क्रमांकावर आणतील अशी ग्वाही यावेळी त्यांनी उपस्थितांना दिली. तर उद्धव ठाकरे यांना राजकारणात फक्त आपल्या मुलाची चिंता असल्याचं शाह म्हणाले

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page