श्रीकृष्ण खातू /धामणी – विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी आणि शारीरिक कसरतीचे महत्त्व ठसवण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या हिवाळी क्रीडास्पर्धा केंद्र, प्रभाग स्तरावर रंगल्या. यात सर्वश्रेष्ठ खेळाचे प्रदर्शन करत तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रदर्शनाने क्रीडा रसिकांना तृप्त केले आहे.
जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा आंबवली नं. 2 ची विद्यार्थिनी कु.सानिका सुदेश झगडे हिने मुलींच्या मोठ्या गटात धावणे या वैयक्तिक क्रीडाप्रकारात अव्वल स्थान प्राप्त करून, केंद्र आंबवली, तालुकास्तरावर धावण्याच्या स्पर्धेमध्ये तसेच प्रभाग देवरुख नंबर 1 च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
त्याच्या या यशासाठी व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ या सर्वांनी त्याचे अभिनंदन केले आहे. मुख्याध्यापक व मार्गदर्शक श्री दिलीप सावंत , सौ दीपाली सावंत ,श्री.गणेश खळे सर यांचेही बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. केंद्रप्रमुख श्री. संतोष तारवे , शिक्षण विस्तार अधिकारी सौ. आखाडे यांनीही अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.