मुंडे महाविद्यालयाच्या विद्याथ्र्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ..
मंडणगड -(प्रतिनिधी) : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी व लालभहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. तसेच एन. एस. एस. विभागाच्या ‘स्वच्छता ही सेवा’ या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालय परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यामध्ये संस्थेचे सहकार्यवाह श्री. विश्वदास लोखंडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल जाधव, उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, कार्यक्रमाधिकारी डॉ. शामराव वाघमारे, डॉ. महेश कुलकर्णी, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. विष्णु जायभाये, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ. मुकेश कदम, डॉ. संगिता घाडगे, तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सर्व स्वयंसेवक सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस संस्थेचे सहकार्यवाह श्री. विश्वदास लोखंडे यांनी तर देशाचे माजी पंतप्रधान लालभहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी डॉ.महेश कुलकर्णी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमा अंतर्गत घेतलेल्या विविध कार्यक्रमांचा थोडक्यात आढावा घेतला.
यावेळी प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांनी सांगितले की, स्वतःच्या सर्वांगीण विकासाबरोबरच देशाच्या विकासाकरिता एन. एस. एस. चे योगदान फार महत्वाचे आहे. कारण नवनिर्मिती करण्याची क्षमता युवकांमध्ये असते, फक्त त्यांना योग्य व्यासपीठ व मार्गदर्शन करण्याची गरज असते. एन. एस. एस. च्या माध्यमातून विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केल्यास त्यांच्यातील शक्तींला दिशा मिळेल. म्हणून विद्याथ्र्यांनी अशा सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची अत्यंत गरज आहे.
‘स्वच्छता ही सेवा’ या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमा अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विद्याथ्र्यांसाठी मंडणगड ग्रामीण रुग्णालयाच्या सहकार्याने ‘आरोग्य शिबीराचे’आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्याथ्र्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच ‘स्वच्छता व पर्यावरण’ या विषयावर ‘पोस्टर प्रदर्शनाचे’ प्रकाशन प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले होते. महिला विकास कक्ष व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘महिला सुरक्षा व सायबर क्राईम’ या विषयावर मंडणगड पोलीस स्टेशनच्या वतीने मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एक दिवस सर्व विद्याथ्र्यानी आपल्या मोबाईलच्या स्टेटसवर स्वच्छतेबाबत स्लोगन ठेवून जनजागृती करण्यात आली. तसेच या पंदधरवडयात विविध कार्यक्रम राबवून ‘स्वच्छता ही सेवा’ या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी उपस्थित विद्याथ्र्यांना स्व्च्छतेची शपथ देण्यात आली. त्यानंतर महाविद्यालय परिसर स्वच्छ करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एन.एस.एस कार्यक्रमाधिकारी डॉ. शामराव वाघमारे, डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. विष्णु जायभाये यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वृतिका खैरे हिने तर आभार कु. मिनाक्षी लोखंडे हिने मानले.
……………………..
फोटो ओळी: M-25 महाविद्यालयात स्वच्छतेची शपथ घेताना मान्यवर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी
व एन.एस.एस. स्वयंसेवक-स्वयंसेविका
मंडणगड प्रतिनिधी