मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना खातेवाटप झाल्यानंतर आता बंगले आणि दालनं वाटप करण्यात आली. कोणत्या मंत्र्यांना कोणता बंगला मिळाला, याबाबत वाचा सविस्तर वृत्त
मुंबई : राज्यातील महायुती सरकारमधील नवनियुक्त मंत्र्यांना आता त्यांच्या निवासासाठी सरकारी बंगल्यांचं वाटप करण्यात आलं. मात्र, काही मंत्र्यांमध्ये सरकारी बंगला आणि मंत्रालयातील दालनं मिळण्यावरुन देखील काही प्रमाणात नाराजी असल्याची चर्चा आहे. शिवसेनेच्या काही मंत्र्यांना फ्लॅट मिळाल्यानं त्यांची नाराजी असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.
‘या’ मंत्र्यांना मिळालं या इमारतीत दालन :
मंत्री पंकजा मुंडे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, उदय सामंत, अतुल सावे, अशोक उईके, मंगलप्रभात लोढा, शंभुराज देसाई, नितेश राणे, आशिष शेलार, अदिती तटकरे, दत्तात्रय भरणे, माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे, संजय सावकारे, नितेश राणे या मंत्र्यांना मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमध्ये दालन देण्यात आलं आहे. तर, चंद्रशेखर बावनकुळे, हसन मुश्रीफ, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, गणेश नाईक, भरत गोगावले, गिरीश महाजन, दादा भुसे, धनंजय मुंडे, जयकुमार रावल, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, मकरंद जाधव पाटील, आकाश फुंडकर, या मंत्र्यांना मंत्रालयाच्या विस्तारीत इमारतीत दालन देण्यात आलं आहे.
कोणत्या मंत्र्यांना मिळाला कोणता सरकारी बंगला :
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवगिरी बंगला देण्यात आला आहे. विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांना ज्ञानेश्वरी बंगला देण्यात आला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना समुद्र किनाऱ्यावरील रामटेक बंगला देण्यात आला आहे. मंत्रिमंडळातील इतर मंत्री हसन मुश्रीफ यांना विशालगड, चंद्रकांत पाटील यांना सिंहगड, गिरीश महाजन यांना सेवासदन, गणेश नाईक यांना पावनगड, राधाकृष्ण विखे पाटील यांना रॉयलस्टोन, धनंजय मुंडे यांना सातपुडा, शंभूराज देसाई यांना मेघदूत, पंकजा मुंडे यांना पर्णकुटी, दादा भुसे यांना जंजिरा, गुलाबराव पाटील यांना जेतवन, मंगलप्रभात लोढा यांना विजयदूर्ग, उदय सामंत यांना मुक्तागिरी, संजय राठोड यांना शिवनेरी, जयकुमार रावल यांना चित्रकूट, अतुल सावे यांना शिवगड, अशोक उईके यांना लोहगड, आशिष शेलार यांना रत्नसिंधु, दत्तात्रय भरणे यांना सिद्धगड, अदिती तटकरे यांना प्रतापगड, शिवेंद्रराजे भोसले यांना पन्हाळगड, जयकुमार गोरे यांना प्रचितीगड बंगला देण्यात आला आहे.