देवरूख- क्रीडा युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, रत्नागिरी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची शालेय कोल्हापूरविभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
१९ वर्षाखालील गटात महाविद्यालयाच्या अक्षता विश्वास रेवाळे(१२वी कला) हिची ८०० मी. धावणे स्पर्धेसाठी, तर राज सुरेश धूलप(१२वी कला) याची क्रॉस कंट्री (६ की. मी. धावणे) स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक प्रा. सागर पवार यांचे मार्गदर्शन लाभत आहे. विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेल्या अक्षता रेवाळे व राज धुलप यांना त्यांनी मिळवलेल्या यशासाठी प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी सन्मानित करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालय जिमखाना समन्वयक प्रा. सानिका भालेकर, क्रीडा शिक्षक प्रा. सागर पवार आणि प्रा. धनंजय दळवी उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, प्रा.एम. आर. लुंगसे, प्रा. विजय मुंडेकर, प्रा. सुनील वैद्य, प्रा. स्वप्नाली झेपले आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
फोटो- प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांच्यासह यशस्वी विद्यार्थी अक्षता रेवाळे, राज धूलप, प्रा. सौ. भालेकर, प्रा. पवार.
छाया- प्रा. धनंजय दळवी.