
देवरुख – अमेरिकन सॉफ्टवेअर कंपनीमध्ये डायरेक्टर पदावर काम करणारे मुळचे पूणे येथील आकाश मावळे यांची भारतातील एका प्रथितयश विद्यापीठ असलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे या संस्थेत कार्यकारणी सदस्य (General body member)म्हणून निवड करण्यात आली.
आकाश पुण्यातल्या एका प्रतिथयश युनिव्हर्सिटी वर ज्या विद्यापीठातून शिक्षण घेतलेले पी. व्ही नरसिंहराव व व्ही. पी. सिंग हे पंतप्रधानपदापर्यंत पोहचले. अशा संस्थेत काम करण्याची संधी त्याना मिळते आहे. ही गोष्ट सगळ्यांसाठी अभिमानास्पद आहे त्यांच्या ज्ञानाचा उपयोग युनिव्हर्सिटीला नक्की होईल असा आशावाद साडवली येथील जैन समाजाने व्यक्त केला. आकाश मावळे हे दिगंबर जैन कासार समाज संस्था शाखा रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष व माजी गटशिक्षणाधिकारी अशोक मोहिरे यांच्या मोठ्या बहिणीचा मुलगा आहेत.
त्यांना दोन भाऊ असून ते हि उच्चविद्या विभूषित आहेत.
आकाश मावळे यांनी आयआयटी पवई मधून एमबीए केले असून त्यांची स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी आहे. ते अमेरिकन कंपनीत संचालक पदावर हि काम करतात.. त्यांना साडवली जैन कासार समाजाच्या वतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या..