एअर इंडिया ५०० विमाने खरेदी करणार; तब्बल १०० अब्ज डॉलरचा करार…

Spread the love

एअर इंडियाने सुमारे ५०० नवीन विमान खरेदी साठी एक मोठा करार केला आहे. हा करार अंदाजे 100 अब्ज डॉलरपेक्षा अधिक किंमतीचा आहे. एअर इंडियाने दिलेली ऑर्डर ही आजपर्यंतच्या कोणत्याही विमान कंपनीने दिलेली सर्वात मोठी ऑर्डर ठरु शकते. उद्योगातील सूत्रांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितले की, हा करार फ्रान्सच्या एअरबस आणि प्रतिस्पर्धी बोईंग यांच्यात समान रीतीने विभागला गेला आहे.

१०० अब्ज डॉलरपेक्षा अधिक किंमतीचा करार.

एअर इंडियाने ५०० नवीन विमान खरेदीचा करार हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विमान क्षेत्रातील करार ठरू शकतो. एअर इंडियाने हा करार एअरबस आणि बोईंग या दोन कंपन्यांशी केला आहे. पुढील आठवड्यात या कराराची अधिकृतरित्या घोषणा होईल. असे सूत्रांचे म्हणणे आहे. एअर इंडियाने २५० एअरबस विमाने खरेदी करणार असल्याचे मान्य केले आहे. यामध्ये २१० सिंगल-आइसल A320neos आणि ४० वाइडबॉडी A350 मध्ये विभागलेले आहेत. तर, २२० बोईंग विमानांमध्ये ७३७ MAX नॅरोबॉडी जेटची १९० विमाने, ७८७ वाइडबॉडीची २० विमाने आणि ७७७Xs ची १० विमाने आहेत.

अमिरातीसारख्या आखाती प्रतिस्पर्ध्यांचे वर्चस्व.

सूत्रांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितले की, एअरबस आणि एअर इंडियाने शुक्रवारी (दि. १०) करारावर स्वाक्षरी केली आहे. बोईंगने २७ जानेवारी रोजी एअरलाइनशी करार करण्यास सहमती दर्शविली होती. टाटांनी एअर इंडियाची मालकी घेतल्याच्या एका वर्षानंतर हा करार झाला आहे. एअरबसने या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. २७ जानेवारी रोजी कर्मचार्‍यांना दिलेल्या नोटमध्ये, एअरलाइनने सांगितले आहे की, ते “नवीन विमानांसाठी ऑर्डर करत आहेत. या ऑर्डरमुळे अमिरातीसारख्या आखाती प्रतिस्पर्ध्यांचे जिथे वर्चस्व आहे त्या ठिकाणी एयर इंडिया आपलं वर्चस्व निर्माण करु शकते, देशांतर्गत बाजारपेठेचा मोठा वाटा काबीज करण्यात मदत करेल.

टाटांनी पदभार स्वीकारल्यानंतर
एअर इंडियाचे एमडी-सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, रतन टाटांनी पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या एका वर्षात ऑपरेटींग विमानांची संख्या २७% ने वाढली आहे आणि ती आता १०० वर आहे. दैनंदिन फ्लाइट्सची संख्या ३०% वाढली आहे. साप्ताहिक आंतरराष्ट्रीय सेवा ६३% वाढली आहे. सोळा नवीन आंतरराष्ट्रीय मार्ग सुरू केले आहेत. (१६ पैकी लवकरच काही सुरू केले जातील) आणि विद्यमान नऊ मार्गांची वारंवारता वाढवण्यात आली आहे. सरासरी दैनंदिन प्रवासी ७२% ने वाढले आहेत. आणि दैनंदिन महसूल दुप्पट झाला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page