
अहिल्या नगर- अहिल्यानगरमधील संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथील लष्करातील हवालदार रामदास साहेबराव बढे (वय ३४) यांना जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्यावर असताना वीरमरण आले. आज बुधवारी मूळगावी त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे.
बढे लष्कराच्या फिल्ड रेजिमेंट युनिट ३४ मध्ये कार्यरत होते. सध्या त्यांची नियुक्ती तंगधार सेक्टरमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर होती. तेथे कर्तव्यावर असताना २४ मार्च रोजी त्यांना वीरमरण आले. त्यांच्यावर मूळ गावी बुधवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथील जवान रामदास बढे यांना दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले. संगमनेर तालुक्यातील मेंढवण सारख्या छोट्याशा गावातील रामदास बढे यांनी २४ वर्ष देशसेवा केली. दोन महिन्यांनंतर सेवानिवृत्त होणार होते मात्र जम्मू काश्मीरमध्ये २४ तारखेला झालेल्या दहशतवादी चकमकीत त्यांना वीरमरण आले.
सोमवारी काश्मीर खोर्यातील तंगधार क्षेत्रात पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार सुरु झाल्यानंतर भारताच्या जवानांनीही त्याला तसेच प्रत्युत्तर दिले. मात्र दुर्दैवाने या गोळीबारात जखमी झाल्याने लष्करात हवालदार पदावर कार्यरत असलेल्या संगमनेर तालुक्यातील मेंढवणच्या रामदास साहेबराव बढे या जवानाला वीरमरण प्राप्त झाले. त्यांचे पार्थिव खोर्यातून मुंबईला विमानाने पाठवण्यात आले असून बुधवारी (२६ मार्च) मेंढवण या त्यांच्या मूळगावी त्यांच्यावर संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद रामदास बढे यांच्या पश्चात वृद्ध वीरमाता, पत्नी, अकरावीत शिकणारी मुलगी, नववीत शिकणारा मुलगा आणि छोटा भाऊ असा परिवार आहे. त्यांच्यावर पोलिस आणि नंतर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वीर जवान यांना पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.