
मुंबई- छत्रपती संभाजीनगर शहरात आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. सकाळी ११ वाजता या बैठकीला सुरुवात होणार असून या बैठकीत मराठवाड्यासाठी अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, या बैठकीआधीच एक मोठी बातमी समोर आली आहे.


राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरानंतर आता दोन्ही जिल्ह्यांचीही नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद शहरानंतर आता जिल्ह्याचंही नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं आहे. त्याचबरोबर उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव बदलून धाराशिव करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच याबाबतची घोषणा करणार आहे. विशेष बाब म्हणजे, मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारने आलेल्या आक्षेपांची पडताळणी झालेली नाही.

त्यामुळे तूर्तास औरंगाबादचं नाव औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नाव उस्मानाबाद जिल्हा असंच ठेवायचं ठरवलं होतं. परंतु मात्र सरकारने राजपत्र प्रकाशित करुन काढून दोन्ही जिल्ह्याचे नाव बदलली आहे.

त्यामुळे इथून पुढे उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव आणि औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर असणार आहे. दरम्यान, तब्बल ७ वर्षांच्या कालखंडानंतर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. मराठवाड्याला मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी राज्य सरकारकडून मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यासाठी सिंचन, शेती आरोग्य, शिक्षण, दळणवळण, आणि उद्योगासाठी ४० हजार कोटींच्या पॅकेजचे गिफ्ट मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.