रत्नागिरी- लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात बॅनर वॉर सुरु झाला आहे. कणकवली येथे शिंदे गटाकडून ‘वक्त आने दो, जवाब भी देंगे और, हिसाब भी लेंगे’ असा आशय असलेले बॅनर पाहायला मिळाले होते. या बॅनरवर उदय सामंत आणि किरण सामंत यांचे फोटो देखील होते. याच बॅनरबाजीचे पडसाद आता रत्नागिरीमध्ये दिसून येत आहेत.
दरम्यान उदय सामंत यांच्या पाली गावामध्ये भाजपचे बॅनर लागले आहेत ‘बाप बाप होता है’! ‘झुंड मे तो कुत्ते आते है, शेर अकेला आता है’ अशा आशयाचे बॅनर रत्नागिरीमध्ये भाजपकडून लावण्यात आले आहेत. भाजपकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर नारायण राणे आणि त्यांच्या मागे वाघाचा फोटो लावला आहे. कोकणात सुरु असलेल्या बॅनरवॉरमुळे महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष सुरु असल्याचे शक्यता वर्तवली जात आहे.
नारायण राणे गटाकडून उत्तर..
कणकवलीत बॅनर वॉर सुरूच आहे. आता बाप बाप होता है… झुंडमे कुत्ते आते है शेर अकेला आता आहे… अशा आशयाचा नारायण राणे यांचा फोटो असलेला बॅनर लागला आहे. शिंदे गटाच्या बॅनरला राणे स्टाईलने उत्तर देण्यचा प्रयत्न या बॅनरमधून करण्यात आला आहे. कणकवली शिवाजी चौकात सुरू झालेले बॅनर वॉर आता कणकवलीच्या मेन नाक्यावर आले आहे. पटवर्धन चौकात हे बॅनर लावले आहे. रत्नागिरीत ही रात्री या आशयाचे बॅनर लागले होते. हे बॅनर वॉर नेमके काय स्वरूप घेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राणेंच्या समर्थकाकंडूनही बॅनरबाजी
कणकवली येथील बॅनरनंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. सामंत बंधूंनीच हा बॅनर लावून राणेंना इशारा देण्याचा प्रयत्न केलाय, असी चर्चा येथे रंगली होती. शिवसेनेच्या या बॅनरनंतर कणकवलीतही एक एक बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर नीतेश राणेंचा फोटो होता. ‘हमारा वक्त आया है, तुम्हारा वक्त आने नहीं देंगे. तुम्हारे ही इलाके में आके तुम्हे ही जबाब देंगे’, असे या बॅनरवर लिहिण्यात आले होते.
उदय सामंत यांचे समर्थक काय उत्तर देणार?
दरम्यान, कणकवली येथील शिवसेनेच्या बॅनरनंतर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली होती. काही उत्साही कार्यकर्त्यांनी हा बॅनर लावला आहे, असे सामंत म्हणाले होते. पण पाली येथील बॅनरमुळे आता शिवसेनेचे कार्यकर्ते नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.