अद्वय हिरे उद्धव ठाकरेंच्या गटात दाखल

Spread the love

मालेगाव | काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झालेली पाहायला मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर, शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. महत्त्वाचे म्हणजे, या बंडानंतर आतापर्यंत ठाकरे गटाच्या बऱ्याच नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची उतरती कळा सुरू आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मात्र अशातच आता ठाकरेंसाठी एक मोठी दिलासदायक माहिती समोर आली आहे.

दरम्यान भाजपला जोरदार धक्का बसला आहे. भाजपचे मालेगावातील शिलेदार डाॅ. अद्वय हिरे यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. भाजपला सोडचिठ्ठी देत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ही बाब ठाकरे गटासाठी एक दिलासा ठरली आहे.

शुक्रवारी ठाकरेंच्या मातोश्री बंगल्यावर हिरे चार वाजता ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळं हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, अद्वय हिरे यांच्या या निर्णयामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हिरे हे नाशिक जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page