
संगमेश्वर/ दिनेश अंब्रे – नावडी संगमेश्वर येथील प्रतिष्ठित व्यापारी मनोहर शेठ भिडे यांचा नातू अद्वैत ओंकार भिडे वय आठ वर्षे हा केंद्रशाळा संगमेश्वर नंबर दोन मधील इयत्ता दुसरी मध्ये हा विद्यार्थी शिकत असून सध्या अभ्यासाबरोबर आवडीने सिस पेन्सिल स्केच , तसेच रंग , खडू व स्केचपेन यांच्या साह्याने अनेक देव देवतांची चित्र, मंदिर, राजवाडे, किल्ले ,निसर्ग देखावे , व्यक्तिरेखाचित्रे , रेखाटण्यात मग्न असतो. आजपर्यंत अनेक मुलांची व्यक्तिचित्र पेन्सिलने रेखाटले आहेत. तसेच रेखाटन्यामध्ये तो जाणकार आहे. लहानपणापासून चित्रकलेमध्ये आवड असल्याने त्याचे कौतुक होत आहे.
अद्वैतचे वडील ओंकार भिडे यांना पखवाज वाजवणे,आई अनया यांना रांगोळी काढणे ,अशा कला अवगत असून आजी माधवी भिडे वहिनी यांना सामाजिक कार्याची आवड असून भजन मंडळ, महिला मंडळ, यामध्ये त्या मार्गदर्शक भूमिका बजावतात.अशा मंडळींच्या कुटुंबात घडत असणाऱ्या अद्वैतचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश अंब्रे यांनी गुलाब पुष्प देऊन अद्वैतचे कौतुक केले आहे.