रत्नागिरी, दि. 18 (जिमाका) : शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत जिल्ह्यामध्ये मंजूर मुला- मुलींची (एकूण २) वसतिगृहे नव्याने सुरू असून, या वसतिगृहांमध्ये इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील बारावीनंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशित विद्यार्थ्याना प्रवेश देण्यात येणार आहे.
प्रवेशांसाठी संबंधित वसतिगृहामध्ये अर्जाचे वाटप सुरू आहे. इच्छुक व पात्र विद्यालयीन विद्यार्थ्यांनी गृहपाल यांच्याकडून वसतिगृह प्रवेश अर्ज घेऊन तात्काळ भरून संबंधित वसतिगृहात जमा करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.
व्यावसायिक व बिगर व्यावसायिक प्रवेशासाठी अभ्यासक्रमाच्या वसतिगृहात अर्ज उपलब्ध आहेत. या वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य व दरमाह निर्वाह भत्ता दिला जातो. या वसतिगृहामध्ये शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सर्व सोई सुविधा दिल्या जाणार आहेत. प्रवेश घेण्याकरिता संबंधित वसतिगृहात संपर्क साधावा, असे आवाहनही श्री.चिकणे यांनी केले आहे.