
मंडणगड(प्रतिनिधी) : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान पदवी महाविद्यालय व कर्मवीर भि. रा. तथा दादा इदाते वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्षे 2025-2026 करिता इयत्ता 11वी वाणिज्य व विज्ञान, बी. ए., बी. कॉम. व बी. एस्सी. प्रथम वर्ष अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरु करण्यात आली आहे.
तालुक्यातील सर्व विद्यार्थी आणि पालकांनी यांची नोंद घ्यावी व प्रवेश अर्जासाठी त्वरीत महाविद्यालयात संपर्क साधून व ऑनलाईन प्रवेशाची माहिती घेवून आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांनी महाविद्यालयाच्या वतीने केले आहे. सदर महाविद्यालय हे सन 1996 पासून सुरु असून या महाविद्यालयास नॅक कडून ‘ब’ दर्जा तर आय.एस.ओ. मानांकनही प्राप्त केले आहे. तसेच या महाविद्यालयास मुंबई विद्यापीठाचा मानाचा ‘बेस्ट कॉलेज’ पुरस्कारही प्राप्त झालेला आहे.
या महाविद्यालयामध्ये आवश्यक त्या सर्व शैक्षणिक सोयीसुविधा विद्यार्थ्यानाकरीता उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.
तसेच विद्यार्थ्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाकरीता दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. दिनांक 13 जून 2025 रोजी पासून महाविद्यालयातील नियमित तासिका सुरु होणार आहेत. या वर्षी इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने असल्याने प्रवेश प्रक्रिया माहिती घेण्यासाठी महाविद्यालयात विद्यार्थ्यानी संपर्क साधावा तसेच तालुका परिसरातील इयत्ता 10वी व इयत्ता 12वी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यानी त्वरीत प्रवेश घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी 9423877117 / 8793358663 या मोबाईलवर संपर्क साधवा.
———-
फोटो – M-02 मुंडे महाविद्यालय परिसर फोटो
मंडणगड प्रतिनिधी