०२ सप्टेंबर/नवी दिल्ली– भारताची सूर्य मोहीम आदित्य एल-1 (Aditya L1) यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आली आहे. भारताच्या पहिल्या सौर मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे (ISRO) शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, चांद्रयान-3 च्या यशानंतर भारताने पुन्हा एकदा आपला अंतराळातील प्रवास सुरु केला आहे.
पुढे बोलताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे की, संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी आमचे अथक प्रयत्न हे सुरुच राहतील. चांद्रयानाच्या नंतर भारताने आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. यासाठी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी केले अभिनंदन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील इस्रोचे अभिनंदन केले आहे. यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, आपल्या शास्त्रज्ञांनी वेळोवेळी आपले सामर्थ्य सिद्ध केलं आहे. भारताचे पहिले सौर मिशन आदित्य L1 चे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल देशाला अभिमान आणि आनंद आहे.
https://twitter.com/AmitShah/status/1697880611636355554?t=Njl3h7LA_zt86-SVYyfw6Q&s=19
इस्रोच्या संपूर्ण टीमचे या महत्त्वपूर्ण कामगिरीसाठी अभिनंदन. अमृत महोत्सवीवर्षात आत्मनिर्भर भारत बनवण्याच्या दृष्टीने अंतराळ क्षेत्रातील हे महत्त्वाचं पाऊल आहे.