उल्हासनगर (अशोक शिरसाट)
उल्हासनगर – प्रलंबित मागण्या मान्य होत नाहीत म्हणुन दि. २३ जानेवारी २०२४ रोजी संघटनेला आमरण उपोषणास बसण्याचे टोकाचे पाऊल उचलले होते उल्हासनगर पालिका आयुक्त अजीज शेख यांना दिलेल्या निवेदनात संघटनेने म्हटले आहे तसेच
पालिका आयुक्त अजीज शेख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की संघटनेच्या वतीने आपल्या निदर्शनास आणुन देण्यात येत आहे की, उमनपा अधिकारी कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्याकरीता आपणांस वारंवार पत्र व्यवहार करण्यात आला आहे
दि. ०५/१२/२०१८ पासून आमच्या संघटनेला दालन उपलब्ध करून मिळावे यासाठी निवेदन दिले आहे तसेच दि. १८/०१/२०२३ च्या बैठकीत आपण लवकरच संघटनेला दालन देण्याचे मान्य केले होते. यापुर्वी मुख्यालयाच्या आवारात इतर संघनांना दालन देण्यात आले आहे. परंतू महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी अधिकारी कल्याण ही संघटना मागासवर्गिय कर्मचा-यांची संघटना असल्याने आमच्या पत्रांना केराची टोपली दाखविण्यात येत आहे. आमच्या संघटनेने वारंवार पत्रव्यवहार करूनही अधिकारी/कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लागत नाहीत. वारसाहक्क/अनुकंपा तत्वावरील उमेदवारांना नियुक्ती देत नाहीत, सातवा वेतनची उर्वरीत रक्कम रोखीने देत नाहीत तसेच १०,२०,३० चा लाभ दिला जात नाही, शिक्षण विभागातील शिक्षकेतर कर्मचारी यांना आजपर्यत ७ वा वेतन लागू झालेला नाही, सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती दिली जात नाही, गटविम्याची रक्कम अधिकारी/कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर किंवा मयत झाल्यानंतर देण्यात येत नाही. अधिकारी/कर्मचारी यांच्यावर वर्षानुवर्षे अन्याय केला जात आहे.
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी अधिकारी कल्याण महासंघ ही संघटना मागासवर्गिय कर्मचा-यांची संघटना असल्याने वर्षानुवर्षे दालन मिळणेस अन्याय होत आहे, भेदभाव (जातीवाद) केला जात आहे, हे नाकारू शकत नाहीत. ही बाब गंभीर असुन यावर लवकरात लवकर मार्ग काढावा अन्यथा संघटना टोकाचे पाऊल उचलल्याशिवाय राहणार नाही व याला जबाबदार पालिका प्रशासन राहील याची नोंद घ्यावी. संघटनेने उल्हासनगर महापालिका अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, यांना निवेदन देताना सविस्तर चर्चा केली आणि कामगारांचे आणि महाराष्ट्र कास्ट्राईप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे समस्या ऐकून घेतले म्हणून उल्हासनगर महापालिकेचे कामगार यांचे प्रलंबि मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईप संघटनेचे उपोषण मागे घेतले असून उल्हासनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी सर्व मागण्या ८ दिवसात पूर्ण करु असे आश्र्वासन दिले तसेच निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष दिपक मंडविया, महासचिव सिध्दांत गाडे, संघटक राजेश फक्के, कोषाध्यक्ष नवीन चव्हाण, प्रसिध्दी अशोक शिरसाट , यांच्यासह आदी कामगार यावेळी उपस्थित होते पोलीस कर्मचारी यांनी सुध्दा सहकार्य केले