नेरळ: सुमित क्षीरसागर- कर्जत तालुक्याची जबाबदारी दिलेल्या आमच्या महिला पदाधिकारी नम्रता कांदळगावकर उत्तम कामगिरी करत आहेत. त्यांच्याकडून राबवण्यात येणारे उपक्रम हे स्तुत्य असल्याचे प्रतिपादन भाजप महिला आघाडीच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांनी केलं आहे. नेरळ येथे भाजप महिला मोर्च्या आयोजित मोफत आरोग्य शिबिर व हळदी कुंकू कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटल, हार्मनी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा यांच्या माध्यमातून महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला.
नेरळ येथील लक्ष्मी बँक्वेट हॉल सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मंचावर भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, जिल्हा सरचिटणीस संध्या शारबिंद्रे, जिल्हा चिटणीस अश्विनी अत्रे, कर्जत महिला तालुकाध्यक्ष नम्रता कांदळगावकर, प्रतीक्षा लाड, स्नेहा गोगटे, समिधा टिल्लू, प्रतिभा घावरे, कर्जत तालुकाध्यक्ष राजेश भगत, फ्रेंड्स ऑफ बिजेपीचे नितीन कांदळगावकर, नेरळ शहराध्यक्ष संभाजी गरुड आदी मान्यवर उपस्थित होते.
तर यावेळी उपस्थित २२५ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये जनरल तपासणी, कान, नाक, घसा, डोळे, अस्थी रोग, दंत तपासणी आदी तपासणी करण्यात आल्या. तर मान्यवरांच्या हस्ते डॉ. सृष्टी खैरनार, सीए पूजा परमार सुर्वे, क्रिकेटर गार्गी साळुंके, सामाजिक कार्यकर्त्या सुषमा पोतदार यांना विशेष कामगिरी महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच महिला शक्ति वंदन मधील सीआरपी शीतल पुजारी, सुचिता शेळके, रागिणी घिगे, तन्वी भवारे, निशा भोईर, ज्योत्स्ना भगत, संगीता भगत, कुसूम बोराडे, साधना म्हसे, जयश्री कडव, समीक्षा दळवी, गीता तुपे यांना गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्जत महिला मोर्चाच्या सरचिटणीस राधा बहुतुले, उपाध्यक्षा वर्षा सुर्वे, प्रीती तिवारी, सरस्वती चौधरी, मनाली शिंदे, सुरेखा पाषाने, शीतल पुजारी यांनी विशेष मेहनत घेतली.