ठाणे : दबाव वृत्त ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात मंगळवारी दिवा, मुंब्रा, कळवा, मानपाडा या भागात अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. इमारती, अनधिकृत गाळे, बैठे बांधकाम यांच्यावर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथक आणि प्रभाग समितीनिहाय पथकांनी ही कारवाई केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहीम सलगपणे राबविण्यात येणार आहे.
दिवा क्षेत्रात, जिवदानी नगर, प्रियदर्शनी अपार्टमेंटजवळ एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावर कारवाई करण्यात आली. तसेच, दिवा पूर्व येथील दत्त मंदिराच्या शेजारी असलेल्या इमारतीच्या सहाव्या मजल्याचा स्लॅब तोडण्यात आला. शिबली नगर गेटच्या समोर दोन मजली बांधकाम पाडण्यात आले. एम.एस कम्पाऊंड मधील दोन मजल्यांच्या वर कॉलम असलेल्या तीन इमारतींवर कारवाई करण्यात आली.
मुंब्रा येथे नताशा चाळ येथे एक मजली बांधकाम निष्कासित करण्यात आले. कळवा येथे कुंभार आळीत एका तळमजल्याचे आर.सी.सी स्लॅब व दुसऱ्या मजल्याच्या स्लॅबसाठी उभारण्यात आलेले सेंट्रीग व स्टील काढण्यात आले. तसेच, विटावा गणेश विसर्जन घाट येथे तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याचे स्लॅब ब्रेकर मशीनच्या सहाय्याने तोडण्यात आले. माजिवडा-मानपाडा भागात कासारवडवली येथे रत्नतेज इमारतीजवळील बैठे बांधकाम, तीन गाळ्यांचे वाढीव बांधकाम काढण्यात आले
जाहिरात