दापोली – मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे शैक्षणिक प्रदर्शन मोठ्या उत्साहाने संपन्न झाले. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग बॉडी चेअरमन लियाकत रखांगे यांच्या हस्ते करण्यात आले. विज्ञान, गणित, उर्दू, मराठी, हिंदी सामाजिक शास्त्र व आर्ट गॅलरी आदि चे उद्घाटन आलेल्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्ष सिराज रखांगे, इकबाल परकार, कॉलेज कमिटी चेअरमन आरिफ मेमन, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद मणियार, टाळसुरे हायस्कूलचे मुख्याध्यापक संदेश राऊत, सारंग पंचक्रोशी हायस्कूलचे मुख्याध्यापक संतोष हजारे, कोकणी हायस्कूलचे मुख्याध्यापक अशरफ अंजार्लेकर, राजेंद्र कुंभार, अनिल देसाई, सत्यवान दळवी, यु.ए. दळवी इंग्लिश हायस्कूलच्या मुख्याध्यापिका नुजहत रखांगे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रदर्शनास दापोली, मंडणगड, खेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी या प्रदर्शनास भेट देत मुख्याध्यापक, शिक्षक व सहभागी मुलांचे कौतुक केले. त्याचबरोबर दापोलीचे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव यांनी प्रदर्शनाला भेट देत मुलांच्या शैक्षणिक साधनांची पाहणी करत कौतुक केले.
या प्रदर्शनात एकूण दीडशेच्या वर प्रकल्प विद्यार्थ्यांनी बनवलेले होते. बहुसंख्य पालक या प्रदर्शनास उपस्थित होते. शैक्षणिक साधने पाहून त्यांनीही मुलांचे कौतुक केले. शहरातील यु.ए. दळवी इंग्लिश मिडीयम हायस्कूल, कोकणी इंग्लिश मीडियम हायस्कूल आदी शाळेतील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट देत माहिती जाणून घेतली. शैक्षणिक प्रदर्शन यशस्वी होण्याकरिता मुख्याध्यापक अय्युब मुल्ला सह प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.