रामचंद्र म्हात्रे विद्यालयात ध्यान धारणेची कार्यशाळा उत्साहात संपन्न.
उरण दि 5(विठ्ठल ममताबादे)- उरण तालुक्यातील रामचंद्र म्हात्रे विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी परम पूज्य श्रीमाताजी निर्मलादेवी प्रणित सहजयोगाच्या माध्यमातून ध्यान धारणेची कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी सहजयोग विषयातील तज्ञ मार्गदर्शक ठोंबरे सर, रमाशंकर चौरसिया सर, भूषण काळे, कविता वळवे ,अश्विनी काळे यांनी ध्यान धारणेचे महत्त्व विशद केले. आणि कुंडलिनी शक्ति जागृत करण्यात आली. ध्यान धारणेच्या माध्यमातून स्मरण शक्तीचा विकास होतो. अभ्यासात प्रगती होते, मन:शांती आणि आनंद मिळतो. सहजयोग केल्याने होणार्या फायद्यांविषयी यावेळी माहिती देण्यात आली .
ही संपूर्ण शास्त्रोक्त पद्धत आहे. यावेळी नेरूळ, कोपरखैरणे आणि पनवेल येथील ज्येष्ठ सहजयोगी जयराम मुकादम, बाबुराव रनावरे, राजेंद्र अहिरराव ,जयश्री नाईक, वसंत कडू, अतुल मिसाळ, रामचंद्र येवले इत्यादी मान्यवर उपस्थित होते, जगभरातील 140 देशांमध्ये सहजयोग केला जातो.कार्यशाळेत उपस्थित असलेल्या 700 विद्यार्थ्यांकरिता चार सत्र घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्याधर गावंड यांनी केले तर आभार प्रदर्शन नंदलाल पाटील यांनी केले.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य सुभाष ठाकूर, नितेश गावंड, संगीता म्हात्रे, निवास गावंड, हिमांशू पटेल, रमेश शेवाळे, व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे सहकार्य लाभले.