रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील चिपळूण-संगमेश्वर विभागादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामांसाठी २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते सकाळी १०.३० या वेळेत ३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे ३ रेल्वेगाड्यांवर परिणाम होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या मेगाब्लॉकच्या पार्श्वभूमीवर ०११३९ क्रमांकाची नागपूर-मडगांव स्पेशल २५ ऑक्टोबर रोजी १ तास ४० मिनिटे कोलाड-चिपळूण विभागादरम्यान थांबवण्यात येणार आहे. या दिवशी १६३४६ क्रमांकाची तिरूवअनंतपुरम-लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्स्प्रेस रत्नागिरी-संगमेश्वर विभागादरम्यान ४० मिनिटे थांबवण्यात येणार आहे. १२०५१ क्रमांकाची सीएसएमटी मुंबई-मडगांव जनशताब्दी एक्स्प्रेस कोलाड-चिपळूण विभागादरम्यान ४० मिनिटे थांबवण्यात येणार आहे.
मडगांव-कुमटा विभागादरम्यानची २६ ऑक्टोबर रोजी ३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ११ वा. घेण्यात येणारा मेगाब्लॉक दुपारी २ वाजता संपेल, या मेगाब्लॉकमुळे ०६६०२ क्र. ची मंगळूर-मडगाव स्पेशल २६ ऑक्टोबर रोजी कुमटा-मडगांव विभागादरम्यान रद्द करण्यात आली आहे.