महाराष्ट्राची भजन परंपरा अविरतपणे जपणारा प्रतिभावान कलावंत… श्री. समिर सुभाष आंब्रे.

Spread the love

संगमेश्वर:-(प्रतिनिधी) तालुक्यातील संगमेश्वर नावडी (आंब्रे वाडी) येथील भजनाची परंपरा जपणारा उदयोन्मुख कलावंत म्हणून श्री. समिर सुभाष आंब्रे यांचे नावं संपूर्ण संगमेश्वर तालुक्यात आदराने घेतले जाते..

श्री. समिर आंब्रे बुवा यांचे शालेय शिक्षण संगमेश्वर तसेच बुरंबी येथे १२ वी पर्यंत झाले. शालेय जीवनापासूनच अभंग म्हणणे भावगीत तसेच भक्तीगीत म्हणण्याची आवड निर्माण झाली. श्री देवी निनावी मंदिर येथे होत असलेल्या डबल बारी भजनाच्या बारी बघून आपसूकच त्या कडे ते वळले गेले..

त्यांच्या घराण्यात पूर्वजांचा विशेषतः तबला मृदुंग आदि वारसा लाभला आहे.. या सर्व गोष्टीत त्यांना वेळोवेळी त्यांची आई. सौ. स्मिता आंब्रे तसेच वडील श्री. सुभाष आंब्रे यांच्याकडून प्रोत्साहन मिळाले आहे.. तसेच संगमेश्वर गावातील ज्येष्ठ भजनप्रेमी श्री. सुधीर काका विचारे यांची त्यांना मोठी साथ मिळाली. या क्षेत्रात त्यांनी कै. संदेश पाटणकर बुवा यांच्याकडून भजनाचे धडे गिरवले.आणि पुढील वाटचालीसाठी मुंबईस्थित असलेले रायगड भूषण पुरस्कार प्राप्त. श्री. संतोष शितकर बुवा यांना आपल्या गुरुस्थानी मानले.

संगमेश्वर तालुक्यातील नवोदित तसेच असंघटित कलाकारांना एकत्रित करुन त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांची सुरू असलेली धडपड खरोखर वाखाणण्याजोगी आहे. यासाठी त्यांनी संगमेश्वर तालुक्यातील अनेक ज्येष्ठ तसेच समवयस्क भजनी बुवांना साथीला घेउन त्यांच्याकडून मार्गदर्शन घेउन संगमेश्र्वरी भजन मंडळ तालुका संगमेश्वर या नावाची संघटना देखील स्थापन केली आहे.

यावेळी त्यांना ज्येष्ठ बुवा श्री. महेंद्र नांदलजकर . श्री. नंदू पांचाळ बुवा. श्री. आनंद लिंगायत बुवा. अमोल चव्हाण. बुवा. श्री. गजानन घेवडे बुवा यांचे विशेष सहकार्य मिळाले . सध्या या मंडळाचे ते अध्यक्ष स्थानी आहेत..

नाभिक समाजातील संत शिरोमणी श्री. सेना महाराज. संत तकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज अश्या थोर संतांची शिकवण याच्या अभ्यासपूर्वक जोरावर त्यांनी विशेष अशी गजर रचले आहेत..

त्या गजरांची कायमच लोकांच्या मुखी प्रशंसा झाली आहे. स्वतःच्या आयुष्यातील पहिली डबल बारी त्यांनी. श्री निनावी देवी मंदिर संगमेश्वर येथे..

कोकण रत्न बुवा श्री. नारायण मिरजुलकर यांच्या सोबत केली असून. श्री. वासुदेव वाघे. श्री. किरण किर. श्री. प्रसाद राणे. श्री. बने बुवा. श्री. नांदलजकर बुवा. श्री. अरुण पांचाळ. श्री दिपक पांचाळ. अश्या ज्येष्ठ बुवांसोबत त्यांनी डबल बारी भजन केली आहेत..

स्पर्धा मधून सुध्दा त्यांनी सहभाग घेउन. आपली कला वेळोवेळी सिद्ध केली आहे. त्यामध्ये विशेष म्हणजे धामापूर येथे झालेली भजन स्पर्धा आणि कसबा येथे झालेली तालुकास्तरीय भजन स्पर्धेत त्यांनी प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले आहे.

या भजन क्षेत्रात ते अनेकांना आपले आदर्श मानतात.. आणि ध्येय बाबतीत म्हणायचं झालं.. तर त्यांचं एवढंच म्हणणं असतं की.. संगमेश्वर तालुक्यातील भजनी बुवा हा कुठल्याही क्षेत्रात मागे पडता कामा नये.. आणि त्यासाठी आपल्याला जेवढे काही करता येईल तेवढे नक्कीच करू..

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page