राजापूर / प्रतिनिधी – राजापूर तालुक्यातील तुळसुंदे येथील इयत्ता ३ री मध्ये शिकणाऱ्या (अंदाजे वय वर्षे १) चिमुरडीवर त्याच गावातील एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याचे निदर्शनास आले आहे.
याचा निषेध करून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावे या मागणीचे निवेदन जैतापूर पंचक्रोशीतील सर्वपक्षीय नागरिकांनी नाटे पोलिसांना दिले आहे .यामध्ये महिलांची लक्षणीय उपस्थित होती .
त्या मुलीवर झालेल्या या अत्याचारामुळे तिची प्रकृती बिघडल्याने तिला रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते ही घटना खूपच घृणास्पद व अमानवीय असून समाजाला काळीमा लावणारी आहे. त्यामुळे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर घटनेचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत.
आरोपीचे नाव पारस भिकाजी आडिवरेकर आहे असे समजते . या प्रकरणी आपण व्यक्तीशः लक्ष घालून लवकरात लवकर निःपक्षपातीपणे सखोल चौकशी करून संबंधीत गुन्हेगाराला त्वरित कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून पुढे असे प्रकार करण्यास कोण धजावणार नाही.असे प्रत्यक्ष नाटे पोलीस अधिकाऱ्यांना भेटून सांगितले असून तसे लेखी निवेदन दिले आहे .
यावेळी सिद्धी शिरसेकर ,हर्षदा खानविलकर, भाग्यश्री चव्हाण, साक्षी जैतापकर ,प्राजक्ता पांचाळ, स्वरा भोसले सम्राज्ञी शिरवडकर ,साक्षी शिरवडकर ,तेजस्विनी मोर्ये , पूजा शिरसेकर ,प्रियांका नार्वेकर, पूजा करगुटकर, अलमिनाब म्हस्कर, गुलजार ठाकूर ,सानिका कोठारकर तजिमा फडणीस ,मंदा वाडेकर आदी महिलांसह दिवाकर आडविलकर, रमेश लांजेकर, प्रशांत गावकर सत्यवान आडीवेकर, शशांक शिरवडकर ,उमेश चव्हाण राजेश गावकर, संदीप कदम आदींसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते .