महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेवर धावणार विशेष लोकल

Spread the love

• मुंबई: मध्य रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने देशभरातून मुंबईत येणाऱ्या अनुयायांसाठी विशेष १२ गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे

मध्ये रेल्वेने ५ आणि ६ डिसेंबर (मंगळवार- बुधवार) मध्यरात्री परळ-कल्याण आणि कुर्ला-पनवेलदरम्यान १२ विशेष लोकल गाड्या चालवण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला-परळ विशेष ही गाडी रात्री १२.४५ वाजता कुर्ल्याहून रवाना होणार आहे आणि परळ येथे रात्री ०१.०५ वाजता पोहोचेल.

कल्याण- परळ विशेष गाडी कल्याणहून रात्री ०१.०० वाजता रवाना होईल आणि परळ येथे ०२.१५ वाजता पोहोचेल.

ठाणे-परळ विशेष गाडी ठाण्याहून रात्री ०२.१० वाजता रवाना होईल आणि परळ येथे २.५५ वाजता पोहोचेल.

परळ-ठाणे विशेष गाडी परळहून रात्री ०१.१५ वाजता रवाना होईल आणि ठाण्याला ०१.५५ वाजता पोहोचेल.

परळ-कल्याण विशेष गाडी परळहून रात्री ०२.२५ वाजता रवाना होईल आणि कल्याणला ०३.४० वाजता पोहोचेल.

परळ-कुर्ला विशेष गाडी परळहून रात्री ०३.०५ वाजता रवाना होईल आणि कुर्ला येथे ०३.२० वाजता पोहोचेल.

वाशी-कुर्ला विशेष गाडी वाशीहून रात्री ०१.३० वाजता रवाना होईल आणि कुर्ला येथे ०२.१० वाजता पोहोचेल.

पनवेल-कुर्ला विशेष गाडी पनवेलहून सकाळी ०१.४० वाजता रवाना होईल आणि कुर्ला येथे ०२.४५ वाजता पोहोचेल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page