
पिंपरी चिंचवड | पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे दोन भावांनी मिळून वडिलांची हत्या केली. हे दोघे भाऊ एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यानंतर त्यांनी त्यांच्या फराळ बनवणाऱ्या कारखान्याच्या भट्टीत वडिलांचा मृतदेह जाळला.
वडिलांचा खून करणारे दोन्ही भाऊ महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. गुन्हा लपविण्यासाठी त्यांनी वडिलांच्या अस्थी भट्टीतून काढून इंद्रायणी नदीत फेकून दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, सुजीत (२१) आणि अभिजीत (१८) यांनी त्यांच्या वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे त्यांची हत्या केली.
या प्रकरणाचा खुलासा करणाऱ्या टीमचा भाग असलेले पोलिस अधिकारी किशोर पाटील यांनी सांगितले की, हे कुटुंब उस्मानाबादहून खेडजवळील मोई येथे काही वेळापूर्वीच स्थलांतरित झाले होते. येथे आल्यानंतर त्यांनी स्नॅक्स युनिट सुरू करून स्वत:चा व्यवसाय सुरू केला.