संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब येथील एका स्वयंघोषीत राजकीय पुढाऱ्याने    भिंत घालून पाखाडी अडवली

Spread the love

संगमेश्वर :- तालुक्यातील कोसुंब येथील एका स्वयंघोषीत राजकीय पुढाऱ्याने गावपुढाऱ्यास हाताला धरून कोसुंब मधलीवाडीकडे जाणारी पाखाडी भिंत घालून अडवली आहे . यामुळे या भागातील लोकांना येण्या – जाण्याचा मार्गच बंद झाला आहे .
माहितीनुसार, संबंधिताला ही जमीन गावच्या सोसायटीसाठी देण्यात आली होती . मात्र , आता ही जमीन व्यक्तीगत स्वार्थासाठी हडप करायची आहे . या संदर्भात कोसुंब ग्रामस्थांनी तक्रार निवारण मंचाकडे तक्रारदेखील केली आहे . या सोसायटीचे कार्यक्षेत्र तीन गावांचे असल्याने संताप व्यक्त होत आहे . तरी संबंधितांनी याची दखल घ्यावी व असलेली पाखाडी पूर्ववत करावी ; अन्यथा कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागेल , असा इशारा कोसुंब मधलीवाडीमधून देण्यात येत आहे .

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page